शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्यानगरच्या समस्या मनपा सोडवेना

By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST

औरंगाबाद : संजयनगर, स्मशान मारुती मंदिर, गल्ली नं. ४ व इतर अंतर्गत गल्ल्यांत अस्वच्छतेचा कळस झाला असून, मनपाचे औषध फवारणी पथक रस्त्यावर कधी तरी येऊन जाते.

औरंगाबाद : संजयनगर, स्मशान मारुती मंदिर, गल्ली नं. ४ व इतर अंतर्गत गल्ल्यांत अस्वच्छतेचा कळस झाला असून, मनपाचे औषध फवारणी पथक रस्त्यावर कधी तरी येऊन जाते. मात्र, डासांच्या प्रादुर्भावाने डेंग्यूची भीती वाढली आहे. सिडकोने मनपाच्या स्वाधीन केलेल्या वसाहतींमधील किरकोळ प्रश्न सोडविण्यासाठीही अनेकदा अडवणूक होते. अयोध्यानगराचाही तोच प्रश्न प्रलंबित आहे. या भागात शासकीय व अशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच कामगार वसाहत आहे. सध्या शहरात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढले असल्याने नागरिक दक्षता बाळगत आहेत. मनपाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे समजते. गल्लीत असलेल्या खांबावर विजेच्या जोडणीचे जाळे विणल्याने अपघाताची भीती सतत भेडसावते. जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने कावीळ, गॅस्ट्रोसदृश आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून येथील रस्त्याचा व अनेक गल्ल्यांत ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागला; परंतु पाणी, पथदिवे, औषध फवारणी, सफाईच्या प्रश्नांचे मनपा निराकरण का करीत नाही, असा सवाल सावित्री मंडल, विलास काथार, जितेंद्र भारती, लता होणराव, रुख्मण कोल्हारे, हिरालाल खत्री, तसेच अयोध्यानगरातील नीलेश जुंबडे, किरण जाधव, अजय खंडारे, सुधीर मोकळे, योगेश भाकरे, मंगेश पैठणे, विपुल कुलकर्णी, धनेश तंटक, सुदर्शन पठाडे आदींनी उपस्थित केला.