शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित तिकीट रद्द करणे महागले

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाने रेल्वेच्या धर्तीवर आरक्षित तिकीट रद्द करण्याची पद्धती स्वीकारली आहे. यापुढे बस सुटण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कपात होईल. आतापर्यंत चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ ५ ते १० रुपये कपात करून पूर्ण रक्कम परत केली जात होती. नव्या बदलामुळे आरक्षित तिकीट रद्द करणे चांगलेच महागले आहे.आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या या नव्या बदलाची १० जूनपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. एसटी महामंडळातर्फे मागील अनेक वर्षे आरक्षित तिकीट रद्द केल्यावर परतावा दिला जातो; परंतु यामध्ये बदल करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. रेल्वे प्रशासनाचा कित्ता एसटी महामंडळाने गिरविल्याचे दिसते. त्यामुळे एसटी तिकीट आरक्षण केल्यानंतर ते रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे. तिकीट दराबरोबर व्हॉल्वो बसच्या आरक्षणासाठी १०, एशियाड बसच्या आरक्षणासाठी ७, तर साध्या (लाल) बसच्या आरक्षणासाठी ५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आतापर्यंत बस निघण्याच्या चार तास अगोदर तिकीट रद्द केल्यास केवळ आरक्षण शुल्क कपात के ले जात होते. त्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द केल्यानंतरही प्रवाशांचे कोणतेही नुकसान होत नव्हते.गर्दीच्या कालावधीत एसटी बसला प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी अनेक जण जागेचे आरक्षण करतात; परंतु खाजगी वाहतूकदारांकडून कमी रकमेत तिकीट उपलब्ध झाल्यास ‘एसटी’चे तिकीट रद्द करण्याचे प्रकार होतात. त्यातून नुकसान होत असल्याने हा बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूचनेनुसार बदलवरिष्ठ कार्यालयाकडून आरक्षित तिकीट रद्द करण्यासंदर्भातील बदलाची सूचना आली आहे. त्यानुसार बदल करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी दिली.