अध्यक्षस्थानी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष वीरकर, भाजपा युवा मोर्चाचे योगेश सोलाटे, महिला प्रदेश उपाध्यक्षा अनिता देवतकर, महिला जिल्हाध्यक्षा रंजना गायके, सुभद्राताई जाधव, सुमन राजळे उपस्थिती होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका आहे. असे मनोज घोडके बोलताना म्हणाले. बैठकीसाठी समता परिषद जिल्हा संघटक निशांत पवार, गणेश काळे, चंद्रकांत पेहरकर, प्रसन्ना राऊत, तालुकाध्यक्ष देवीदास सोनवणे, शहराध्यक्ष अमोल तुपे, युवक अध्यक्ष अजय भालेकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक साईनाथ सोलाट तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केले. संतोष सोनवणे यांनी आभार मानले.
समता परिषदेच्या बैठकीत आरक्षण बचाव ठराव मंजूर
By | Updated: December 4, 2020 04:08 IST