बाळासाहेब जाधव , लातूरअनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी मराठा आरक्षण लागू आहे की नाही, याची माहिती अधिकाऱ्यांना नसल्यामुळे लातूरच्या एसटी महामंडळातील अनुकंपावरील एका जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे मार्गदर्शन मागविले नसल्यामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या उमेदवारांची ससेहोलपट होत आहे़उदगीर-वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असणारे डी़पी़पाटील यांचे आॅक्टोबर मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या जागेवर अनुकंपा पद्धतीने संधी मिळावी यासाठी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील बाळासाहेब विठ्ठलराव पाटील यांनी लातूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयात अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या अर्जावर अद्याप विचार झाला नाही. मराठा समाजाला नुकत्याच मिळालेल्या आरक्षणानुसार या अर्जावर विचार व्हावा, अशी अपेक्षा उमेदवारांनी केली आहे. परंतु आरक्षणाबाबत स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन आल्यानंतर मराठा समाजातील अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन विभागीय कार्यालयातून देण्यात आले आहे. प्रस्ताव दाखल करुन १३ दिवसाचा कालावधी उलटला तरी या प्रस्तावाबाबत निर्णय झालेला नाही़ त्यामुळे अनुकंपावरील त्या व्यक्तीला संधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे़
आरक्षणाबाबत अधिकारी अनभिज्ञ
By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST