शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: January 8, 2017 00:08 IST

उस्मानाबाद : नगर पालिका निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे

उस्मानाबाद : नगर पालिका निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. गट आणि गणाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, शनिवारी सभापती पदाची आरक्षण सोडत पार पडली. जिल्हाभरातील आठपैकी चार पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिला विराजमान होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी पंचायत समिती सभापतींची सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरूवातीला यापूर्वी पंचायत समित्यांचे सभापतीपद कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, हे उपस्थितांना सांगण्यात आले. त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापतीपद हे ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भूम पंचायत समिती सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटेल, असे समजून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून होते. परंतु, अशा मंडळीच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. येथील सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. परंडा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव पडले आहे. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कळंब आणि उमरगा पंचायत समित्यांचे सभापतीपद मात्र, खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथे इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे. परिणामी पक्षश्रेष्ठींचाही इच्छुकांची मनधरणी करताना चांगलाच कस लागेल. तुळजापूर पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. दरम्यान, वाशी आणि लोहारा या दोन्ही पंचायत समित्यांचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सदरील आरक्षणाच्या चिठ्ठ्या विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आल्या. दरम्यान, पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता इच्छुक मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. (प्रतिनिधी)