शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राखीव प्रवर्गातील सदस्य अडचणीत

By admin | Updated: March 20, 2016 23:40 IST

परभणी :जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़

परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़ त्यामुळे अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ आणि आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती़ या निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते़ अनेकांनी जात प्रमाणपत्राची पडतळाणी केली नसल्याने या उमेदवारांना निवडणूक लढविताना जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केल्याची पावती जोडून निवडणूक लढविण्याची मुभा दिली होती़ मात्र राखीव जागेवर विजयी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक केले होते़ हा कालावधी आता संपला आहे़ त्यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे क्रमप्राप्त झाले आहे़ जिल्ह्यातील अनेक विजयी उमेदवारांनी अद्याप असे प्रमाणपत्र दाखल केले नाही़ मध्यंतरी निवडणूक विभागाने राखीव प्रवर्गातील सदस्यांना नोटीस बजावून लेखी म्हणणे मागविले होते़ अनेक सदस्यांनी आपले म्हणणे तहसीलच्या निवडणूक विभागाकडे दाखल केले. मात्र १८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एक आदेश काढून विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे कळविले आहे़ त्यानुसार राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास त्या व्यक्तीची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानण्यात येईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल, असे कळविले आहे़ त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या सदस्य, सरपंचाची नावे गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावीत, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव गिरीष भालेराव यांनी काढले आहेत़ १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या या आदेशामुळे जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़ (प्रतिनिधी)दोन वेळा पाठविले स्मरणपत्रपरभणी तहसील कार्यालयाने गटविकास अधिकाऱ्यांना ११ मार्च रोजी पत्र दिले असून, तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविलेल्या किती सदस्यांनी जात पडताळणी सादर केली आहे व किती सदस्यांची जात पडताळणी सादर करणे बाकी आहे? याचा अहवाल सात दिवसांत कळवावा, असे सूचित केले आहे़ मात्र सात दिवसांचा कालावधी उलटूनही गटविकास अधिकारी कार्यालयाकडून अद्याप ही माहिती पुरविण्यात आली नसल्याने १६ मार्च रोजी तहसील कार्यालयाकडून गटविकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे़ त्यामुळे किती उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही़ परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडतळाणी समितीकडे अर्ज केले आहे़ परंतु, या समितीकडून अद्याप सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही़ अनेक सदस्यांचे जातवैधता प्रकरणे पडताळणी समितीकडेच प्रलंबित असल्याने हे सदस्य अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत़ यात सदस्यांचा कुठलाही दोष नसल्याने या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी होत आहे़