शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

‘त्या’ कुंटणखान्यावर पुन्हा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वत:च्या बंगल्यात मुलींकडून देहविक्री करून घेणाºया अहिंसानगरातील आंटीच्या घरावर अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वत:च्या बंगल्यात मुलींकडून देहविक्री करून घेणाºया अहिंसानगरातील आंटीच्या घरावर अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष आणि शहर गुन्हेशाखेने रविवारी दुपारी एकत्रित छापा मारला. या कारवाईत आंटी, दलाल, ग्राहकास अटक केली आणि तीन तरुणींची मुक्तता केली.आंटी शोभा वसंत शुक्ला (रा. अहिंसानगर), ग्राहक राजेंद्र आसाराम दहाडे (रा. संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. बीड येथे मराठवाडास्तरीय अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष कार्यरत आहे. औरंगाबाद शहरात देहविक्री होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी उपअधीक्षक भरत गाडे यांचे पथक रविवारी शहरात आले. पथकाने गुन्हेशाखेच्या अधिका-यांना सोबत घेऊन सातारा परिसर, मुकुंदवाडी, एमआयडीसी वाळूज आणि अहिंसानगरातील संशयित ठिकाणांवर डमी ग्राहक पाठवून चाचपणी केली. दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास पथकाने अहिंसानगरात एका घरी बनावट ग्राहक पाठविला. तेव्हा त्या आंटीने पाचशे ते आठशे रुपये दराच्या २५ ते ३० वयोगटातील तीन वेगवेगळ्या तरुणी ग्राहकासमोर उभ्या केल्या. ग्राहकाने आंटीला पैसे दिले आणि त्याने बाहेर पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी घरावर धाड मारली. तेथे आंटीसह, एक दलाल आणि ग्राहक हाती लागला. या तरुणींपैकी एक बीड येथील तर दोन शहरातील आहे. गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे, नंदकुमार भंडारी यांच्यासह अन्य सहा कर्मचा-यांनी सहभाग घेतला.पोलिसांनी धाड मारलेल्या आंटीच्या घरावर यापूर्वी आॅक्टोबरमध्ये गुन्हेशाखेने कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात तिला जामीन मिळाल्यानंतर तिने कुंटणखाना सुरूच ठेवल्याचे आजच्या कारवाईवरून समोर आले. ती ग्राहकांकडून पाचशे ते आठशे रुपये उकळत.