शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका

By admin | Updated: April 16, 2016 23:42 IST

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनसाठी अर्ज दाखल करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांची दिशाभूल करून जुन्या लाभार्थ्यांची यादी तशीच ठेऊन नवीन

लोकमत इफेक्ट : ठिबक अनुदान वाटपाला गतीबाळासाहेब जाधव ल्ल लातूरसुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनसाठी अर्ज दाखल करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांची दिशाभूल करून जुन्या लाभार्थ्यांची यादी तशीच ठेऊन नवीन लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा प्रयत्न कृषी विभागातील एका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे़ याबाबत विभागीय आयुक्ताकडे बोरगाव काळे येथील शेतकऱ्यांनी तक्रार करताच जिल्हा कृषी अधिक्षकांनी त्याबाबत चौकशी समिती नेमली होती़ त्या समितीने केलेल्या चौकशीमध्ये अधिकाऱ्यासह २ कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आले आहे़सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनचा लाभ घेण्यासाठी २०१२ ते २०१६ या कालावधीत शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले़ त्या अर्जाला पुर्वसंमती मिळूनही तीन महिन्यात ठिबकचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे शासनाचे धोरण असतानाही कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसुर करून जुन्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले़ तर नवीन लाभार्थ्यांना ठिबकच्या अनुदानाचा लाभ दिल्याचे समोर आले आहे़ याबाबत काळे बोरगाव येथील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली़ या तक्रारीची दखल घेऊन कृषी आयुक्तांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्याच्या सुचना दिल्या़ दरम्यान उदगीरचे उपविभागीय अधिकारी व्ही़जी़पाटील, कृषी अधिकारी शिंदे, अकाऊंटचे कर्मचारी धुमाळे यांच्या उपस्थितीत समिती नेमण्यात आली़ या समितीने केलेल्या तपासणीमध्ये लातूर उपविभागीय कार्यालयातील एक अधिकारी व अन्य दोन कर्मचारी दोषी आढळल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले आहे़ याबाबतचा अहवाल जिल्हा कृषी अधिक्षकांनी कृषी आयुक्तांकडे पाठविला आहे़ तो अहवाल पाठवून १५ ते २० दिवस पुर्ण झाले आहेत़ तरीही तो अहवाल कृषी अधिक्षकांनी अद्यापपर्यंत उघड न करता दडवून ठेवल्याचे समोर आले आहे़अनुदान वाटपाला मिळाला मुहूर्त़़़‘लोकमत’कडून रखडलेल्या ठिबक सिंचन अनुदानाबाबत ‘अनुदानाचा घोळ’ या शिर्षकाखाली वृत्तमालिका प्रकाशित करताच जुन्या रखडलेल्या लाभार्थ्यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह कृषी आयुक्ताकडे पाठपुरावा सुरु केला आहे़ तसेच २०१५-१६ मध्ये रखडलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान वाटपही सुरु करण्यात आल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ ंइतर तालुक्याचे काय ?लातूर जिल्ह्यातील ठिबक अनुदान वाटपात अनियमितता केल्याचे समितीने केलेल्या चौकशीत आढळून आले आहे़ परंतू इतर तालुक्यातही हिच परिस्थिती आहे़ परंतू याबाबत मात्र ना चौकशी, ना अहवालाची मागणी कृषी अधिक्षकांनी केली़ त्यामुळे ठिबकच्या अनुदान वाटपाच्या अनियमिततेमध्ये इतर तालुक्यातही गोलमाल परिस्थिती आहे़