शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘रोहयो’चा अहवाल गुलदस्त्यात

By admin | Updated: July 12, 2016 00:58 IST

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील अनेक कामांवर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

लातूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील अनेक कामांवर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. काही ठिकाणी बोगस मजूर तर काही ठिकाणी मजूर न लावता यंत्राद्वारे काम करून पैसे उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित करताच चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. परंतु, या चौकशी समितीचा अहवालच अद्याप जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही.रोजगार हमी योजनेअंतर्गत औसा तालुक्यातील वाघोली, खुंटेगाव, सेलू, भादा, आशिव, उंबडगा, उंबडगा (बु.), उंबडगा (खु.) या गावांतील रस्त्यांच्या कामावर बोगस मजूर लावून त्यांच्या नावावरील मलिदा लाटण्याचे काम स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. यामध्ये गुत्तेदारासह काही अधिकारीही गुंतले असल्याने या बोगस कामातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी दोनवेळा डेड्लाईन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला नाही. दरम्यानच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी १२० रस्त्यांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित कामांसाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या या अहवालासाठी आणखी किती दिवस लागणार, याबद्दल या भागातील नागरिकांतून तर्कवितर्क लावले जात आहेत. (प्रतिनिधी) रोहयो कामात औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मजूर आढळून आल्याचे पथकाच्या तपासणीत उघड झाले आहे. यातील बहुतांश कामांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित कामांची तपासणीही या आठवड्यात पूर्ण होईल. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बोगस मजूर लावल्या प्रकरणी नियुक्त केलेल्या समितीत उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मुख्य अभियंता भंडे, तत्कालीन गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, औशाचे तत्कालीन गटविकास अधिकारी या पाच जणांचा समावेश आहे.या समितीकडून १० जानेवारी २०१६ ला सादर होणार होता. परंतु, समितीकडे चौकशीसाठी अधिक काम सोपविण्यात आले. १० जुलै रोजी समितीकडून अहवाल येणार असल्याचे जाहीर झाले. परंतु, त्यावेळेसही अहवाल सादर झाला नाही. आता पुढील आठवड्यात चौकशी समितीचा अहवाल सादर होईल, असे समिती प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.