बीड : येथील जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून गुरूवारी विनंतीवरून बदली झाली. तीन वर्षातील बीड येथील त्यांची कारकीर्द प्रचंड वाद्ग्रस्त राहिली.जिल्हा रूग्णालयात आॅक्टोबर २०१३ दरम्यान शल्य चिकित्सक म्हणून डॉ. अशोक बोल्डे रुजू झाले होते. मागील तीन वर्षांची त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिली. रुग्ण रेफरचे प्रमाण कमी करण्यामध्ये त्यांना यश मिळाले हे त्यांच्या कार्यकाळातील मोठे यश आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान पाच रुग्णांचे डोळे अधू झाल्याने त्यांना प्रशासकीय स्तरावर उत्तरे द्यावी लागली होती. दरम्यान, शल्य चिकित्सकांचे पद रिक्त आहे. दोन दिवसात नवीन शल्य चिकित्सक येणार आहेत. (प्रतिनिधी)
शल्य चिकित्सक बोल्डे यांची बदली
By admin | Updated: October 14, 2016 00:18 IST