शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम घाटाची दुरुस्ती; २५ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:47 IST

कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रम घाटाचे मागील काही वर्षांपासून स्ट्रक्चर आॅडिट न केल्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रम घाटाचे मागील काही वर्षांपासून स्ट्रक्चर आॅडिट न केल्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्या घाटाच्या दुरुस्तीसाठी तातडीने २५ कोटींपर्यंतचे अंदाजपत्रक तयार करून ते नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली मुख्यालयाला पाठविण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर यांनी गुरुवारी केल्या. त्यांनी गुरुवारी घाटाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.लोकमतने २३ आॅगस्टच्या अंकात घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे व बोगद्याचे काम होईपर्यंत घाटाची वाहतुकीला गरज असल्याचे वृत्त प्रकाशित करून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तानंतर दोन दिवसांतच नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख चंद्रशेखर यांनी घाट पाहणी केली. त्यांच्यासोबत प्रकल्प अधिकारी वाय. एन. घोटकर आदींची उपस्थिती होती.औट्रम घाटात बोगद्याचे काम होण्यासाठी आजपासून किमान ५ वर्षांचा कालावधी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) गृहीत धरला आहे. २०२४ पर्यंत तो घाट वाहतुकीसाठी लागणार आहे. ५ वर्षांसाठी घाट सुरळीत ठेवायचा असेल, तर त्यावरील भविष्यातील वाहतुकीच्या अनुषंगाने तेथील सुरक्षा किंवा पर्यायी मार्गाची गरज आहे. बोगद्याचे काम होणार म्हणून घाटाकडे दुर्लक्ष केले होते. लोकमतच्या वृत्तानंतर २५ कोटींचे अंदाजपत्रक घाट दुरुस्ती करण्याचे ठरले आहे.नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे २०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग हस्तांतरित झाला. त्यामध्ये औट्रम घाटाचा समावेश होता. मागील ६ वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर आॅडिट किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने पाहणी झाली नव्हती.