शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
4
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
5
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
6
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
7
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
8
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
9
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
10
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
11
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
12
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
13
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
14
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
15
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
17
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
18
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
19
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
20
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेणूने दिला दोन पिलांना जन्म; पिलांची प्रकृती ठणठणीत

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला.

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी ‘रेणू’या बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला. रेणू आणि दोन्ही पिल्लं अगदी ठणठणीत असून, सुरक्षेच्या दृष्टीने रेणूजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या निष्काळजीपणामुळे रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाला होता. मागील अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही.१७ फेबु्रवारी २०१६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून बिबट्याची एक जोडी औरंगाबादेत आणण्यात आली. रेणू आणि राजा यांना ४०७ मेटॅडोरने ८०० किलोमीटरचा प्रवास घडवून आणण्यात आले होता. रेणू गरोदर असताना तिला हा धोकादायक प्रवास घडवून आणण्यात आला. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात तिला आणल्यानंतर तिने अन्न, पाणी घेणे सोडले. प्राणिसंग्रहालयाचे तत्कालीन संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी तिला गॅस्ट्रो झाला असावा म्हणून चुकीचे औषधोपचार सुरू केले. त्यामुळे नियोजित वेळेपूर्वीच रेणूने तीन पिलांना जन्म दिला. या पिलांची योग्य निगाही न राखल्याने अवघ्या २४ तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. रेणूच्या पिलांचे मृत्यू प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. चौकशीत डॉ. नाईकवाडे दोषी असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.नाईकवाडे यांच्या जागी एक निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी कंत्राट पद्धतीवर नेमण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे प्राणिसंग्रहालय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. जुने दु:ख विसरून रेणू पुन्हा उद्यानात मागील काही दिवसांपासून राजासोबत खेळत-बागडत होती. अलीकडेच तिला पुन्हा गर्भधारणा झाली होती. ही बाब प्राणिसंग्रहालय विभागाने गोपनीय ठेवून तिच्यावर योग्य औषधोपचार सुरू ठेवले. शनिवारी सकाळी ११ वाजता रेणूने दोन गोंडस पिलांना जन्म दिला. सध्या सुरक्षेच्या कारणावरून तिच्याजवळ कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये रेणूच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. तिने काही दिवस अन्नत्यागही केला होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर रेणू काही दिवसांनंतर नॉर्मल झाली होती. मनपा प्रशासन रेणूच्या बाबतीत रिस्क घेण्यास तयार नाही. तिला सर्वोत्तम औषधोपचार आणि सेवा देण्यात येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.