शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजारांच्या कर्जमुक्तीसाठी करावे लागणार नूतनीकरण

By admin | Updated: July 12, 2017 00:33 IST

बीड : बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या चालू खातेदारांना कर्जमाफीपोटी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कर्जाचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या चालू खातेदारांना कर्जमाफीपोटी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कर्जाचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे. तरच बँकेच्या चालू कर्जदारांना अनुदानाचा लाभ मिळणार असून १५ हजारांच्या आतील कर्जदाराचे कर्ज खाते या अनुदानामुळे कर्जमुक्त होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना २००९ ते २०१६ या कालावधीतील थकित कर्ज माफ करण्याचा निर्णय घेताना च चालू कर्जदारांसाठी अनुदान देण्याची योजना घोषित केली. यानुसार कर्जदारांना किमान १५ हजार ते कमाल २५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यासंदर्भात आदित्य सारडा म्हणाले की, बँकेचे चालू कर्जदार सभासद १ लाख १७ हजार आहेत. कर्जाची एकूण रक्कम ३८५ कोटी इतकी आहे. १५ हजार रुपयांच्या आतील कर्जाची रक्कम असणारे कर्जदार सभासद ३२ हजार ९४६ असून त्यांच्या कर्जाची रक्कम ३८ कोटी १७ लाख इतकी आहे. या कर्जदारांनी जर त्यांच्या चालू कर्जाचे नूतनीकरण केले तर त्यांना शासनाच्या १५ हजार रुपये अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे व ते सभासद कर्जमुक्त होतील. यासाठी ३१ जुलै १७ ही शेवटची मुदत तारीख आहे. नूतनीकरण केले नाही तर ते थकित कर्जदार वर्गवारीत जातील, असे सारडा यांनी सांगितले. कर्जमाफीच्या आणि अनुदानाच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे सांगत सारडा म्हणाले की चालू कर्जदार सभासदांच्या मनात अनुदानाविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. थकित कर्ज पुन्हा माफ होईल, अशी पसरत असलेली अफवा हा गैरसमज आहे.