शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेच्या अडचणी झाल्या दूर

By admin | Updated: September 3, 2014 00:03 IST

परभणी : शहर महानगरपालिकेने ४ लाख रुपये खर्चून स्वच्छतेचे साहित्य खरेदी केले असल्याने आता शहर स्वच्छतेला गती येईल,

परभणी : शहर महानगरपालिकेने ४ लाख रुपये खर्चून स्वच्छतेचे साहित्य खरेदी केले असल्याने आता शहर स्वच्छतेला गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.परभणी महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर शहर स्वच्छता व इतर कामे ढेपाळली होती. शहराला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे स्वच्छतेसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड होत होती. त्यातच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार ते सहा महिन्यांचे पगारही थकले होते. त्यामुळे स्वच्छतेची कामे वेळेवर होत नव्हती. स्वच्छतेसाठी खोरे, टोपले, नाल्या काढण्यासाठी लांब खोरे आदी साहित्याची आवश्यकता असते. परंतु दोन वर्षांपासून महानगरपालिकेत या साहित्याचाही तुटवडा जाणवत होता. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.दरम्यान, मनपाने नुकतेच स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आहे. ४ लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. त्यात शहर स्वच्छतेसाठी ३ लाख ९० हजार रुपयांचे तर उद्यान विभागासाठी ३० हजार रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. २०१२ पासून कर्मचाऱ्यांना जाणवणारी अडचण साहित्य खरेदीमुळे दूर झाली आहे. त्याचप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही आता निकाली निघाला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामांना गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गुलमीर खान यांच्या हस्ते वाटपमहानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत २ सप्टेंबर रोजी आरोग्य व स्वच्छता सभापती गुलमीर खान यांच्या हस्ते कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. ४याप्रसंगी नगरसेवक गणेश देशमुख, सुनील देशमुख, युनूस सरवर, सुशील नर्सीकर, गोविंद पारडकर, प्रभाग समिती प्रमुख सय्यद इम्रान, स्वच्छता विभाग प्रमुख करण गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. ४सभापती गुलमीर खान म्हणाले, साहित्य नसल्याने साफसफाई होत नव्हती. पगारही वेळेवर नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष होता. आता महाराष्ट्र शासनाने पगारापोटी १०० टक्के अनुदान मंजूर केले आहे. तसेच सफाईसाठी साहित्यही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सणासुदीच्या दिवसांत स्वच्छतेवर भर द्यावा. स्वच्छता निरीक्षकांनीही आपल्या प्रभागात स्वच्छता करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.