शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलातील अडथळे दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:24 IST

खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गायरान जमीन किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन गरीब लोकांना ती जागा लीजवर (भाडेतत्त्वावर) द्यावी, या औरंगाबाद खंडपीठाच्या निवाड्यानुसार वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थनगर, पंढरपूर गावात जिल्हा परिषदेने या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रमेश गायकवाड यांनी मांडला.तथापि, यासंबंधी न्यायालयीन निर्णयाच्या प्रती जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केल्यास त्यासंबंधी निर्णय घेण्यास सुकर होईल, असे सभागृहात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी मत मांडले. जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, सभेचे पदसिद्ध सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, शिक्षण सभापती मीनाताई शेळके, महिला व बालकल्याण सभापती कुसुमबाई लोहकरे आदींसह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.प्रामुख्याने औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय एकट्या पंढरपूर किंवा वडगाव कोल्हाटीसाठी नसून संपूर्ण राज्यासाठी लागू होतो, ही बाब जि. प. सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, जी गावे गावठाणात वसलेली नाहीत. जी गावे सरकारी गायरान जमिनीवर वसलेली आहेत. त्या ठिकाणी घरकुल योजना राबविता येत नाही, असा शासन निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार महाराष्ट्र सरकारने १२ जुलै २०११ रोजी शासन निर्णय जारी केला. त्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.