शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
2
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
3
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बसून जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
4
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
5
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
6
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
7
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
8
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
9
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
10
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
11
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
12
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
13
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
14
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
15
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
16
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
17
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
18
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा
19
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
20
१२ कोटी ५० लाख रुपयांच्या 'त्या' डीलसह RCB ची ट्रॉफी झाली फिक्स? जाणून घ्या 'चॅम्पियन'वाली स्टोरी

ई-लायब्ररीसाठी रिमोट अ‍ॅक्सेस

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी अद्ययावत करण्यात आली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी अद्ययावत करण्यात आली आहे. तेथील ई-लायब्ररीत सुमारे १९ लाख ई-जर्नल्स आणि ३० लाख ई-बुक्स आहेत. या ग्रंथसंपदेचा लाभ प्राध्यापकांना वेळ आणि स्थळाचे बंधन न ठेवता घेता यावा, यासाठी त्यांना आता रिमोट अ‍ॅक्सेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिक्षकांना आता त्यांचा युजर नेम आणि पासवर्ड दिला जात आहे. त्याआधारे ते आता कोठेही इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या ई-लायब्ररीमधील ग्रंथ वाचू शकतील. त्यांना हवी तेवढी पुस्तके, जर्नल्स, संशोधन पेपर ते डाऊनलोड करू शकणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन बसण्याची गरज नाही. विद्यापीठातील ग्रंथालय विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठातील विविध विभागांत शिक्षण घेणारे विद्यार्थी, संशोधक आणि अध्यापक, असे ३ हजार ५०० सदस्य असलेले लोक तेथील ग्रंथसंपदेचा लाभ घेत असतात. ग्रंथासोबतच तेथे आता ई-लायब्ररीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-लायब्ररीमध्ये १९ हजार ई-जर्नल्स आणि ३० लाखांहून अधिक ई-बुक आहेत. विद्यार्थ्यांनाही लायब्ररीमधील डिजिटल विभागात बसून ई-जर्नल आणि ई-बुक वाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी खुली असते. विद्यापीठात कार्यरत असलेल्या शिक्षकांना रिमोट अ‍ॅक्सेसची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. रिमोट अ‍ॅक्सेसची सुविधा देणारे आपले विद्यापीठ देशातील पहिले ठरले आहे, अशी माहिती ग्रंथपाल धर्मराज वीर यांनी दिली. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठाने बंगळुरू येथील एका कंपनीकडून सॉफ्टवेअर खरेदी केले आहे. त्यासाठी दोन लाख रुपये प्रतिवर्ष शुल्क भरावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ई-लायब्ररी सुरू केल्यापासून या लायब्ररीचा वापरही झपाट्याने वाढला आहे. २००८ मध्ये विद्यापीठाच्या ई-लायब्ररीमधून १२ हजार रिसर्च पेपर डाऊनलोड करण्यात आले होते. आता त्यात झपाट्याने वाढ झाली असून, गतवर्षी तब्बल १ लाख ६५ हजार रिसर्च पेपर संशोधनकर्त्यांनी डाऊनलोड करून घेतले आहेत. यावरून विद्यापीठात होणार्‍या संशोधनाची दखल जगभर घेतली जात आहे. कालपर्यंत विद्यापीठातील संगणकाच्या माध्यमातून शिक्षकांना ई-लायब्ररीतील ग्रंथ आणि जर्नल्सचा वापर करता येत होता. आता ही सुविधा अधिक व्यापक करण्यात आली आहे.लायब्ररीचे सदस्य असलेल्यांना पुस्तके वाचण्यासाठी घरी नेण्याची सुविधा आहे. मात्र, आजपर्यंत ई-लायब्ररीची सुविधा केवळ लायब्ररीमध्येच उपलब्ध होती. अध्यापनाचे कार्य करणार्‍या शिक्षकांना प्रत्येक वेळी लायब्ररीमध्ये जाऊन बसणे आणि संदर्भ गं्रथ हाताळणे शक्य होत नाही. त्यांची अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने ई-लायब्ररीची सुविधा उपलब्ध केली.