शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक कराल तर याद राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:09 IST

परभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कर्जमाफी करताना शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे़ बोलले एक आणि केले वेगळेच़ असा प्रकार झाला असून, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही़ त्यामुळे शासनाला २३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे़ त्यानंतर मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली तर याद राखा, शेतकरी सरकारवर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी परभणीतील एल्गार मेळाव्यात बोलताना दिला़ राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या माफीमध्ये अनेक शेतकरी वगळले गेले आहेत़ बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना माफीचा फायदा होणार असल्याने या कर्जमाफीविरूद्ध राज्यस्तरीय सुकाणू समितीने मार्गदर्शन मेळावे आयोजित केले आहेत़ याचाच एक भाग म्हणून १९ जुलै रोजी परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात एल्गार मेळावा पार पडला़ या मेळाव्यास सुकाणू समितीचे प्रमुख नेते आ़ बच्चू कडू यांच्यासह रघुनाथदादा पाटील, अजित नवले, किशोर ढमाले, अशोक ढवळे, कालिदास आपेट, करण गायकर, डॉ़ अशोक घुले आदींची प्रमुख उपस्थिती होती़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ विजय भांबळे यांनीही मेळाव्यास उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला़ आ़ बच्चू कडू म्हणाले, सध्याचे सरकार म्हणजे घरात हातभट्टी आणि दरवाज्यात अगरबत्ती अशा प्रकारचे आहे़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली खरी़ परंतु, काढलेला अध्यादेश मात्र अफजल खानाचा आहे़ धर्माच्या, पैशाच्या जोरावर असे प्रकार कराल तर शेतकऱ्यांशी गाठ आहे़ हा शेतकरी बेैमान नसून आपल्या इमानदारीचे घेतल्याशिवाय राहणार नाही़, असा इशाराही त्यांनी दिला़ शासनाची कर्जमाफी ही फसवी असून, ती आम्हाला मान्य नाही़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे, आत्महत्या करू नयेत तर लढायला शिकावे, असे आवाहन करतानाच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करा, असा सल्लाही त्यांनी दिला़ आतापर्यंत धर्माच्या, जातीच्या नावावर आम्हाला खेळविले़ परंतु, आता मात्र शेतकरी कट्टरवादी झाला आहे़ हे जून महिन्यात शेतकऱ्यांच्या संपाने दाखवून दिले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही नेत्याची, धर्माची गरज नाही़ ‘गर्व से कहो हम किसान है’ असा नारा देत त्यांनी कर्जमाफी म्हणजे उपकार नव्हे तर शासन शेतकऱ्यांकडून लूटत असलेल्या पैशांचा परतावा आहे़ यावेळी बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली़ ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’ अशा घोषणा देण्यात आल्या़ शेतीमालाला भाव नाही, कर्जमुक्ती नाही तर मतही नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले़ प्रारंभी सुकाणू समितीमधील सदस्य करण गायकर, रघुनाथदादा पाटील, किशार ढमारे, डॉ़ अशोक घुले, कालीदास आपेट यांचीही भाषणे झाली़ आ़ विजय भांबळे, सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेच्या रसिका ढगे यांनी प्रास्ताविक केले़ किसान सभेचे कॉ़ विलास बाबर यांनी सूत्रसंचालन केले़ मेळाव्यास सुरेश भुमरे, स्वराजसिंह परिहार, रामभाऊ घाटगे, गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, अमृत शिंदे, श्रीनिवास जोगदंड, रामेश्वर आवरगंड, बालाजी मोहिते, विठ्ठल तळेकर, रामा शिंदे, धोंडीराम चव्हाण, सुभाष जावळे आदींसह जिल्हाभरातील हजारो शेतकरी उपस्थित होते़