शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळ; आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST

शहरातील धार्मिक स्थळांसंदर्भात अनेक नागरिकांनी मनपाकडे आक्षेप दाखल केले आहेत. उद्या मंगळवार, २४ आॅक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सकाळी १० वाजेपासून सुनावणी घेतली जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांसंदर्भात अनेक नागरिकांनी मनपाकडे आक्षेप दाखल केले आहेत. उद्या मंगळवार, २४ आॅक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सकाळी १० वाजेपासून सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासन निर्देशानुसार धार्मिक स्थळांची वर्गवारीनुसार अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दिली.खंडपीठाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या कारवाईचा अहवाल सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्यात आला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित समितीची बैठक घेऊन आक्षेपांवर निर्णय घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार समितीची बैठक आयुक्त मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी शहरातील ११०१ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यापैकी ४४ धार्मिक स्थळे काढण्यात आल्यामुळे १ हजार ५६ धार्मिक स्थळांच्या यादीवर आक्षेप मागवण्यात आले होते. आॅगस्ट अखेरपर्यंत १ हजार १५९ आक्षेप प्राप्त झाले. आक्षेपांची छाननी करून सुनावणी घेण्यासाठी ६ अधिका-यांची समिती स्थापन करण्यात आली. या अधिका-यांच्या पथकाने धार्मिक स्थळांची स्थळ पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर प्राप्त झालेल्या काही आक्षेपांवरील सुनावणी घेतली होती. पाच पथकांचा अहवाल तयार झाला नसल्यामुळे सुनावणी घेण्यात आली नाही. अधिका-यांनी धार्मिक स्थळांच्या वर्गवारीनुसार तपासणी करून विविध संस्था व विश्वस्तांकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. धार्मिक स्थळांसंदर्भात उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकरिता प्राप्त झालेल्या आक्षेपांवरील सुनावणी उद्या २४ रोजी पूर्ण करून २५ रोजी वर्गीकरण करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात ६ पथकांमार्फत आक्षेपांवरील सुनावणी घेतली जाईल, सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.