औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेत महिला व तरुणींनी हातावर धार्मिक चिन्हांची मेंदी साकारून रंगत आणली. वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ महावीर भवन अंतर्गत सर्व महिला बहुमंडळे, दक्षिण-मध्य तसेच वर्धमान रेसिडेन्सी, सिडको, हडको मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रश्नमंजूषा, नवकार मंत्र सजावट व मेंदी स्पर्धा घेण्यात आली. अष्टमंगल व चौदा स्वप्नांवर आधारित मेंदी स्पर्धेत ५० महिला सहभागी झाल्या होत्या. हातावर सिंह, हत्ती, वृषभ, चंद्र, सूर्य आदींची उत्कृष्ट मेंदी काढण्यात आली होती. वर्धमान रेसिडेन्सी, दक्षिण मध्य बहुमंडळ आयोजित नवकार मंत्र सजावट स्पर्धेत स्पर्धकांनी पुस्तक, ग्रिटिंग कार्ड, वॉलपेपर आकारात नवकार मंत्राची सुरेख सजावट केली होती. या स्पर्धेच्या आयोजक रश्मी जेलमी, सविता लोढा आदी महिला होत्या.चेतना मंडळ हडकोतर्फे झालेल्या प्रश्नमंच स्पर्धेत १५० जण सहभागी झाले होते. यात गणित, चित्रपट, उल्टा पुल्टा आदींवर प्रश्न विचारण्यात आले. आयोजक कल्पना ललवाणी, ललिता राका, मधुबाला गादिया, सुषमा कोठारी, अलका गांधी हे होते.स्पर्धेत आदर्श गुरूगणेश, जाप मंडळ, भक्तांबर, संस्कृती संगीत, विशाल, सुदर्शन, उपासिका आदी मंडळाच्या कमला ओस्तवाल, चंचल चोपडा, नीता गादिया, नीलिमा खिंवसरा, सीमा झांबड, तारा कोचेटा, समता दोशी, लीला सकलेचा, विमला रुणवाल, पुष्पा बाफणा, भावना सेठीया, मंजू कोठारी, पुष्पा जैन आदींची उपस्थिती होती.
हातावर साकारली धार्मिक मेंदी
By admin | Updated: April 16, 2016 01:42 IST