शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सुखप्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक

By admin | Updated: January 31, 2017 23:30 IST

परळी सुख प्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक आसल्याचे विचार श्री गुरू ष.ब्र. १०८ दिगांबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ) वसमतकर यांनी आपल्या प्रवचनातून मांडले.

परळी : गुरू, लिंग, जंगमाची सेवा करावी असा उपदेश श्री संत शिरोमणी मन्मथस्वामींनी केलेला आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करावे, सुख प्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक आसल्याचे विचार श्री गुरू ष.ब्र. १०८ दिगांबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ) वसमतकर यांनी आपल्या प्रवचनातून मांडले. येथील श्री.संत गुरूलिंगस्वामी मठसंस्थान (बेलवाडी) येथे सोमवार पासून संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त येथील वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सोमवारी सकाळी शिवपाठ, परमरहस्यपारायण झाले. त्यानंतर दुपारी १ वा.दिगांवर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमतकर यांचे प्रवचन झाले. प्रवचन करताना शिवाचार्य महाराज म्हणाले की, वीरशैव समाजातील प्रत्येकानेच गळ्यात लिंग धारण करणे आवश्यक आहे. इष्ठलिंगाचे महत्व त्यांनी सांगीतले. मनुष्य हा दुर्लभ आहे. देह उत्तम आहे. गुण आणि संस्कार नसेल तर मनुष्याला किंमत नाही. अनमोल देह जपण्यासाठी गळ्यात लिंग धारण करणे गरजेचे आहे. केलेले कर्म देवाला अर्पण केले तर पाप लागत नाही. आपल्या पाल्यांना आठव्या वर्षाच्या आत दीक्षा दिली पाहिजे. आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याचे काम आई-वडीलच करतात. म्हणूनच मातृ देवो भव, पितृ देवो भव म्हटले जाते. त्यानंतर आचार्य देव भव असे म्हटले जाते. पवित्र देवाला पवित्रताच आवडते म्हणून प्रत्येकाने पवित्र राहिले पाहिजे. ज्या धर्मात आलोत त्या धर्माचे पालन करावे. असे सांगून त्यांनी मनाला मंथन करणारे मन्मथ स्वामी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. जंगम हे शिवाचे मुख आहे. असेही ते म्हणाले. प्रारंभी श्री संत मन्मथस्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोज संकाये, मीरा संकाये या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शिवपाठ व परम रहस्य पारायणास पाचशेपेक्षा अधिक महिला व पुरूष सहभागी झाले होते.या कार्यक्र मात शिवाचार्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचलन सोनल रोडे यांनी केले. तर आभार चेतन सौंदळे यांनी मानले. (वार्ताहर)