परतूर: बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.परतूर तालुक्यात आतापर्यंत एकही मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे विहिरी, कूपनलिका, नदी, नाले यांना पाणी आले नाही. शेतात पीक हिरवे दिसत असले तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे.यामुळे पासाळयातच पाणी प्रश्न सतावू लागला आहे. बऱ्याच दिवसांपासून पाऊस नसल्याने आता पीक माना टाकू लागले आहेत. गवत वाळत आहे. जनावरांच्या चारी व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊसच नसल्याने शेतीची कामेही ठप्प आहेत. एकूणच पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)
पिकांना माना टाकल्या
By admin | Updated: August 18, 2014 00:58 IST