शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समांतरपुढे पालिका प्रशासन हतबल

By admin | Updated: December 14, 2015 23:58 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा समांतरचा मुद्दा गाजला. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी निकाली निघत नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी गोलमोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपनीला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सदस्य आणखीनच आक्रमक झाले. अखेर कोल्हे यांनी समांतरची कंपनी कामेच करत नाही, मी तरी काय करू, असे हतबल उद्गार काढले. समांतर कंपनीच्या कारभाराबाबत सध्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही पडले. नगरसेवक सय्यद मतीन, माधुरी अदवंत, उपमहापौर प्रमोद राठोड, विकास एडके, नंदकुमार घोडेले आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. पाठपुरावा करूनही पाणीपुरवठ्याची कामे होत नसल्यामुळे या सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडले.दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. जलकुंभांचे काम तीन दिवसांत सुरू होईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता देतात; परंतु त्यानंतरही काम सुरू होत नाही, असे अनेक मुद्दे सदस्यांकडून उपस्थित करण्यात आले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी कंपनीला पत्र दिले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललो आहे, अशी मोघम उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या उत्तरांमुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतरही कोल्हे यांनी कंपनीच काम करीत नसल्याचा राग आळवला. शेवटी सदस्यांनी आम्हाला कंपनीशी देणे घेणे नाही, त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हालाच जाब विचारणार, अशी भूूमिका घेतली. अडचणीत आलेल्या कोल्हे यांनी कंपनी काम करीत नाही, म्हणूनच आपण त्यांना नोटीस बजावली आहे, असा खुलासा केला. त्याला उपमहापौर राठोड यांनी आक्षेप घेतला. कंपनीला नोटीस तर आता आयुक्त साहेबांनी दिली आहे. तुम्ही वर्षभर काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याच्या उत्तरात कोल्हे यांनी आपण कंपनीला नोटिसा देत असतो, असे सांगितले. त्यावर महापौर त्र्यंबक तुपे यांनी याआधी तुम्ही कंपनीला किती नोटिसा दिल्या याची माहिती विचारली. त्यानंतर कोल्हे यांनी आपले शब्द मागे घेत याआधी आपण नोटीस नाही, पण वेळोवेळी पत्रे दिली आहेत, असे सांगितले. याच दरम्यान काही सदस्यांनी समांतरला मनपाने आतापर्यंत किती पैसे दिले, याची माहिती विचारली. कोल्हे यांनी ती माहिती देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे या विषयावर बराच वेळ चर्चा सुरू राहिली. अखेर महापौरांनी कोल्हे यांना समज देऊन यापुढे कंपनीकडून योग्य पद्धतीने काम करून घ्या, काम होत नसेल तर कारवाई करा, असे आदेश दिले.