शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:26 IST

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्हा दौºयावर आली आहे़ आ़ सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पहिल्या दिवशी २५ पैकी १४ आमदार दाखल झाले़ काही आमदार मंगळवारी रात्रीच परभणीत आले होते तर काही आमदार बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले़ सकाळी १० वाजता शहरातील सावली विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक आमदारांशी समितीचे सदस्य चर्चा करणार होते़ त्यानुसार चर्चेसाठी जिल्ह्यातील आमदारांपैकी केवळ आ़ विजय भांबळे हेच उपस्थित होते़ यावेळी भांबळे यांनी जि़प़ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजातील अनियमिततेचा पाडाच वाचला़ शौचालय उभारणी अंतर्गत त्यांनी नियमबाह्यरित्या वितरित केलेल्या निधी प्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली़ खोडवेकर यांची चौकशी पूर्ण होवूनही अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नाही़ त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, असेही भांबळे म्हणाले़ तसेच शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या संदर्भातही त्यांनी तक्रारी केल्या़ गरुड या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ पदाधिकारी, सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत़ शिक्षकांच्या बिंदू नामावलीत व नियुक्त्यांमध्ये त्यांच्या काळात अनियमिता झाली़ ई-लर्निंग अंतर्गत संगणक खरेदीतही गैरप्रकार झाले, अशीही तक्रार यावेळी आ़ भांबळे यांच्यासह काही सदस्यांनी केली़ यावेळी समितीचे प्रमुख आ़ पारवे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले़ त्यानंतर समितीने जि़प़च्या पदाधिकाºयांशी चर्चा केली़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, राकाँचे गटनेते अजय चौधरी, सभापती श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, उर्मिला बनसोडे, अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, अधिकाºयांची रिक्त पदे आदी भरण्याची मागणी केली़ त्यानंतर समितीचे सदस्य सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले़जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ७़३० पर्यंत बैठक झाली़ या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला़ २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील त्रुटींच्या मुद्यांवर त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ २०११-१२ मध्ये लघुसिंचन विभागात विविध कामांमध्ये १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाल्याबाबत त्यांनी जाब विचारला़ तसेच पाणीपुरवठा विभागात ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणातही त्यांनी अधिकाºयांना प्रश्न विचारले़ तसेच बांधकाम विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांची अनियमितता २०११-१२ या एकाच वर्षात झाल्याबद्दल त्यांनी या विभागाच्या अधिकाºयांनाही धारेवर धरले़शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, डेस्क खरेदी आदींमध्ये ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणात त्यांनी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना उत्तरे विचारली़ यावर गरुड यांना उत्तरे देताना नाकी नऊ येत होते़ आरोग्य विभागातील अनियमिततेचा विषयही यावेळी चर्चेला आला़ विषय पत्रिकेत या अनियमितेवर चर्चा झाल्यानंतर अनेक प्रकरणे निकाली काढण्याऐवजी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाºयांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे अधिकारी चांगलेच घामेघूम झाले होते़