शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मयत व्यक्तींना घेऊन गृहनिर्माण संस्थेची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:31 IST

लातूर : दोन मयत व्यक्तींना घेऊन सिग्नल कॅम्प येथे सिंधू अपार्टमेंट हौसिंग सोसायटी निर्माण केली असून सोसायटीच्या नोंदणी ठरावाच्या बैठकीला मयत व्यक्तींची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे़

लातूर : दोन मयत व्यक्तींना घेऊन लातूर शहरातील सिग्नल कॅम्प येथे सिंधू अपार्टमेंट को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी निर्माण केली असून सोसायटीच्या नोंदणी ठरावाच्या बैठकीला मयत व्यक्तींची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे़ ठरावावर मयत व्यक्तींच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या ठोकल्या आहेत़ यामुळे बैठकीचा व हाऊसिंग सोसायटीच्या स्थळ पाहणीचा अहवाल देणाऱ्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत़ सिंधू अपार्टमेंट को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नोंदणीसाठी प्रवर्तकांची बैठक ६ आॅगस्ट २०१६ रोजी झाली़ या बैठकीला जम्बु विठ्ठलराव चावरे आणि शामसुंदर खटलोया या मयतांची उपस्थिती असल्याचे दर्शविण्यात आले़ चावरे यांचे निधन २३ फेबु्रवारी २०१४ रोजी तर खटलोया यांचे निधन २५ आॅगस्ट २००७ मध्ये झाले असताना हाऊसिंग सोसायटी करण्याचा ठराव या दोघांच्या उपस्थितीत झाल्याचा घेण्यात आला़ त्या ठरावावर सूचक आणि अनुमोदक म्हणून या दोघांच्या सह्याही ठोकण्यात आल्या आणि हा प्रस्ताव नोंदणीसाठी ३१ आॅगस्ट २०१६ रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय लातूर येथे दाखल करण्यात आला़ प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या निबंधकांनी २८ नोव्हेंबर २०१६ रोजी सहकार अधिकारी बी़एच़ शिंदे यांना हौसिंग सोसायटीचे स्थळ व सभासदांच्या भेटी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले़ त्यानंतर सहकार अधिकाऱ्यांनी ७ डिसेंबर २०१६ रोजी स्थळ व सभासदांची पाहणी केल्याचा अहवाल निबंधकांकडे सादर केला़ स्थळ पाहणीत सहकार अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या १३ प्रवर्तकांच्या भेटी घेवून तसेच सोसायटीच्या संबंधित स्थळाची पाहणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित असते़ मात्र सहकार अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवर्तकांनी केलेल्या ठरावानुसार अहवाल दिला आणि मोकळे झाले़ या अहवालानुसार सहायक निबंधक सहकारी संस्था निबंधकांनी ७ डिसेंबर २०१६ रोजी सिंधू अपार्टमेंट को़आॅप हौसिंग सोसायटीला (सिग्नल कॅम्प) नोंदणीचे प्रमाणपत्र बहाल केले़ दरम्यान, सिंधू अपार्टमेंट को़-आॅप हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी मीनाक्षी नंदकिशोर काळे यांनी अ‍ॅड़ जीवन करडे यांच्या मार्फत सहायक निबंधक संस्था कार्यालयात याबाबत तक्रार केली आहे़ या तक्रारीवरून सहायक निबंधक सहकारी संस्थेने सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे़ खुलासा सादर न केल्यास संस्थेविरूद्ध अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे़