शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रजिस्टरमध्ये खाडाखोड

By admin | Updated: August 25, 2016 23:50 IST

औरंगाबाद : पंचायत समितीमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तथ्यशोधनासाठी जि.प.च्या वित्त विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

औरंगाबाद : पंचायत समितीमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तथ्यशोधनासाठी जि.प.च्या वित्त विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती पंचायत समितीला आतापर्यंत शिष्यवृत्तीचा मिळालेला निधी, वाटप केलेला निधी, शिल्लक निधीचा हिशेब घेणार आहे. दरम्यान, पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर लागले; मात्र त्या रजिस्टरमध्ये प्रचंड खाडाखोड निदर्शनास आली. त्यामुळे शिष्यवृत्ती घोटाळ्याची तीव्रता वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘लोकमत’ने सर्वप्रथम शिष्यवृत्तीचा हा घोटाळा उघडकीस आणला. २४ आॅगस्ट रोजी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेची यंत्रणा हालली. सकाळी ८ वाजेपासूनच जि. प. वित्त विभागातील दोन अधिकाऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी साळुंके यांना दूरध्वनी करून कार्यालय उघडायला लावले. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिष्यवृत्तीच्या हिशेबाचे दप्तर दाखविण्याची मागणी केली; पण सन २०११ ते २०१५ पर्यंतच्या नोंदी घेतलेले शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर दाखविण्यास पंचायत समितीचे अधिकारी- कर्मचारी असमर्थ ठरले. एक रजिस्टर दाखविण्यात आले. काही शाळांना शिष्यवृत्तीचे वाटप केल्याच्या नोंदी त्या रजिस्टरवर होत्या; पण नोंदी खोडलेल्या असून, मोठ्या मार्कर पेनद्वारे ‘शिल्लक’ असे लिहिलेले अधिकाऱ्यांच्या नजरेस पडले. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटपात मोठी गडबड असल्याची खात्री अधिकाऱ्यांना पटली.ही बाब त्यांनी जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण यांना सांगितली. चव्हाण यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे (पान ५ वर)उपस्थिती भत्ताही हडपसन २०११-१२ मध्ये पिसादेवी केंद्रांतील तब्बल १४ शाळांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा उपस्थिती भत्ताही केंद्रीय मुख्याध्यापकाने हडप केल्याची बाब आता समोर आली आहे. काल पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या पथकाने पिसादेवी केंद्रात जाऊन आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्याचा हिशेब घेण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील किती केंद्रांवर अशा प्रकारचा उपस्थिती भत्त्याचा अपहार झालेला आहे, याचाही ताळमेळ लावण्यात पंचायत समितीचे अधिकारी- कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कारवाई अपेक्षितयासंदर्भात जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तमराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल आम्ही घेतली आहे. दोन अधिकाऱ्यांचे पथक काल पंचायत समितीमध्ये चौकशीसाठी पाठविले होते. त्या अधिकाऱ्यांना २०११ ते २०१५ पर्यंतचे शिष्यवृत्तीसंबंधीचे रेकॉर्ड मिळाले नाही. ४प्राप्त निधीची काय विल्हेवाट लावली, त्याचे रेकार्ड पंचायत समितीला दाखवावेच लागेल. संबंधित अधिकाऱ्यांना काल एक रजिस्टर मिळाले; पण त्यामध्ये प्रचंड खाडाखोड दिसून आली. शिष्यवृत्ती वाटपामध्ये अनियमितता झालेली प्रथमदर्शनी दिसते. यात जे दोषी आढळून येतील, त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल.