शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत होणार विभागीय जलसाक्षरता केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:26 IST

समाजात जलजागृती निर्माण होण्यासाठी औरंगाबादेत विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्यात यशदा, पुणे येथे कायमस्वरूपी मुख्य जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली आहे.या सोबतच जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे हे केंद्र स्थापन करण्यास बुधवारी शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली.

औरंगाबाद : राज्यात वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. एकप्रकारे गरजेपेक्षा पाणी कमीच असल्याची परिस्थिती आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, पावसाचा लहरीपणा यामुळे भविष्यात पाण्यावरील ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पाण्याचा नियोजनपूर्वक आणि काटकसरीने वापर करण्यासाठी समाजात जलजागृती निर्माण होण्यासाठी औरंगाबादेत विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे हे केंद्र स्थापन करण्यास बुधवारी शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली.

राज्यात यशदा, पुणे येथे कायमस्वरूपी मुख्य जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली आहे. यासोबत औरंगाबादेतील वाल्मीसह अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी आणि चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.भविष्यात गरजेप्रमाणे उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. संपूर्ण मराठवाड्यात जलसाक्षरता निर्माण करण्याची जबाबदारी औरंगाबादच्या विभागीय केंद्राच्या माध्यमातून पार पाडली आहे. 

पाण्याचा पुनर्वापर केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, कार्यशाळा, वाचन साहित्य, प्रसार साहित्यांद्वारे जनतेत जलसाक्षरता निर्माण करण्यासह जलसाठे, जलसंधारणाची कामे, सिंचन प्रकल्प, पाण्याचे प्रदूषण, त्यावरील उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर यासंदर्भात साहित्य निर्माण करणे, जनतेला उपलब्ध करून देण्यासह संशोधन, अभ्यास, प्रलेखन केले जाईल. विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या संरचनेत विभागीय संचालक, विभागीय कार्यकारी संचालक यांच्यासह प्रलेखन, प्रशिक्षण अधिकारी, लिपिक, टंकलेखक राहतील.

जलसेवक, जलनायकांची फळीजलजागृती व जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम तयार करणे, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जलसाक्षरता केंद्रात केली जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जलनायक, जययोद्धा, जलदूत, जलसेवक आणि शासन स्तरावर कार्यरत किंवा शासन सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी जलकर्मी अशा स्वयंसेवकांची फळी निर्माण केली जाणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना