शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी मजदूर सेनेच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:00 IST

बीड : बीड, परळी व माजलगाव नगर पालिकेतील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड, परळी व माजलगाव नगर पालिकेतील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. तब्बल ३१ दिवस उलटूनही प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारावर घोषणा देताना एका आंदोलकाचा रक्तदाब वाढल्याने चक्कर आली. त्यामुळे सर्वांचीच धावपळ झाली. जिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर ते शुद्धीवर आले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.सफाई कामगारांना समान काम समान वेतन देऊन थेट नियुक्ती देण्यात यावी, बीड न.प.घंटागाडी सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याने त्यांच्या बंद दिवसाच्या वेतनासह पूर्ववत कामावर रूजू करून घेण्यात यावे, बीड न.प. पाणी पुरवठा कामगारांचे पाच महिन्यांचे थकित वेतन देण्यात यावे, परळी न.प.तील कंत्राटी सफाई कामगारांच्या विश्रांतीच्या दिवसाचे परिश्रमिक देण्यात यावे, अतिकालिक दराचे वेतन देऊन बोनस द्यावा, नागनाथ एंटरप्रायझेसची आर्थिक क्षमता नसताना कामाचा आदेश दिला, याची चौकशी करावी, सर्व कामगारांना नुकसानभरपाई देऊन त्यांची थेट नियुक्ती करावी, माजलगावातील सफाई कामगारांची १२ टक्के व न.प.चे १२ टक्के असा भविष्य निर्वाह निधी कपात करून त्यांच्या नावे जमा केला आहे. याची चौकशी करून प्रत्येक कामगाराच्या नावे भविष्य निर्वाह निधीची किती रक्कम जमा केली, याची माहिती द्यावी, यासारख्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. तब्बल ३१ दिवस उलटूनही याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.सोमवारी नगर परिषदेपासून या कामगारांचा निघालेला मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे निवेदन दिल्यानंतर आक्रमक कामगारांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये सफाई कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येथेच एका आंदोलकाला चक्कर आली.