शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

दूध संकलन घटले

By admin | Updated: March 17, 2015 00:42 IST

हणमंत गायकवाड , लातूर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असली तरी यंदा मात्र दूध उत्पादनात घट होत आहे़ गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी

हणमंत गायकवाड , लातूरपशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असली तरी यंदा मात्र दूध उत्पादनात घट होत आहे़ गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी ४९ हजार ५६४ लिटर प्रतिदिनी दूध संकलन होत होते़ यंदा फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिन सरासरी ४६ हजार ०७ लिटर संकलन होत आहे़ ३ हजार ५५७ लिटरची घट आहे़ झपाट्याने संकलन कमी होत आहे़ चारा-पाणी टंचाईचा हा परिणाम फेब्रुवारी महिन्यापासून जाणवत आहे़जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने दूध संकलनावर नियंत्रण ठेवले जाते़ सहकारी जिल्हा संघ आणि तालुका संघामार्फत तसेच खाजगी दूध प्रकल्पामार्फत शेतकऱ्यापासून दूध संकलन केले जाते़ सहकारी संस्थेच्या १४९, तालुका संघाच्या १२ आणि खाजगी ५ दूध प्रकल्पाअंतर्गत दूध संकलनाची प्रक्रिया जिल्ह्यात प्रतिदिन चालते़ जिल्हा संघ आणि तालुका संघाबरोबर खाजगी दुध प्रकल्पामध्ये कपिला डेअरी प्रोजेक्ट, गोपाळ महाराज मिल्क प्रोडक्ट, वारणा डेअरी लामजना आणि शिरुरअनंतपाळ, रिलायन्स दूध प्रकल्प उदगीर, साई डेअरी बाभळगाव या पाच खाजगी संस्थांचा समावेश आहे़ जिल्ह्यात सध्यस्थितीत १४९ सहकारी मार्फत १२ हजार ८९० लिटर दर दिवसाला दूध संकलन होत आहे़ तालुका संघाच्या १२ संस्थामार्फत ३ हजार ९६ लिटर आणि खाजगी ५ दुध प्रकल्पाअंतर्गत ३० हजार २२ लिटर दिवसाला दुध संकलन केले जाते़ एकूण ४६ हजार ९७ लिटर संकलन होत आहे़ हे संकलन दर दिवसाचे आहे़ महिन्याचा विचार केला तर सरासरी १३ लाख ८० हजार २१० लिटर दूध संकलन आहे़ हे संकलन गेल्या फेब्रुवारी महिन्यातले आहे़ गतवर्षी याच फेब्रुवारी महिन्यात जिल्हा संघाचे १८ हजार ८९०, तालुका संघाचे ६ हजार ५३७, खाजगी प्रकल्पाचे २३ हजार ६३७ असे एकूण सरासरी ४९ हजार ५६४ प्रतिदिनी दूध संकलन होते़ म्हणजे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी १४ लाख ८६ हजार ९२० लिटर दूध संकलन होते़ गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला ३ हजार ५५७ लिटर आणि महिन्याला १ लाख ६ हजार ७१० लिटरची घट आहे़ चारा-पाणी टंचाई असली तरी जिल्ह्यात ८० हजार ६१४ दूध देणाऱ्या म्हशी आहेत़ दूध देणाऱ्या संकरित गायी ८ हजार ४२८ असून दूध देणाऱ्या देशी गायींची संख्या ५७ हजार ४१४ आहे़ जिल्ह्यात दुभते धन १ लाख ४६ हजार ४५६ आहे़