शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेकडे १४१९ जणांची पाठ

By admin | Updated: April 8, 2017 23:22 IST

उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज दाखल केलेल्या ६१३१ पैकी १४१९ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़

उस्मानाबाद : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी प्रक्रियेतून ४७१२ पैकी तब्बल ४४३२ उमेदवार पात्र ठरले आहेत़ तर २८० उमेदवार अपात्र ठरले असून, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६१३१ पैकी १४१९ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २३ मार्च पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे़ ४६ जागांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेत ६१३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ यात ६७५ महिला उमेदवारांचा समावेश होता़ वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पोलीस भरती प्रक्रिया पहाटेच्या सुमारास घेण्यात आली़ भरती प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्यालय मैदानाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ छायाचित्रीकरण करण्यात आले़ विशेषत: भरती प्रक्रिया सुरू असलेल्या कालावधीत मुख्यालयाच्या आवारात उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली होती़ २३ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत पुरूष उमेदवारांची भरती प्रक्रिया घेण्यात आली़ यात अर्ज दाखल केलेल्या ५४५६ पैकी ४१९० उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली़ तर १२६६ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़ शारीरिक चाचणी प्रक्रियेत यातील ३९५८ उमेदवार पात्र ठरले असून, २३२ जण विविध कारणांनी अपात्र ठरले़ या भरती प्रक्रियेसाठी ६७५ महिला उमेदवारांचेही अर्ज आले होते़ यापैकी ५२२ जणींनी शारीरिक चाचणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला़ तर १५३ जणींनी पोलीस भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़ या चाचणीत ४७४ महिला उमेदवार पात्र ठरल्या असून, ४८ महिला उमेदवार अपात्र ठरल्या आहेत़ भरती प्रक्रियेतील एका तोतया विरूध्द दाखल गुन्ह्याव्यतिरिक्त ही भरती प्रक्रिया शांततेत पार पडली़