शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत १४ कोटींची वसुली

By admin | Updated: June 29, 2014 00:45 IST

जालना : प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांसाठी शनिवारी आयोजित लोकअदालतीत एकूण २३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जालना : प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांसाठी शनिवारी आयोजित लोकअदालतीत एकूण २३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात मावेजा व दंडाचे असे एकूण १४ कोटी ७ लाख ४७ हजार ३०० रुपये वसूल झाले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश रा.वि. देशमुख होते. उदघाटक म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कैलास रत्नपारखे व सरकारी वकील मुकुंद कोल्हे होते. यावेळी १४ कोटी ७ लाख १० हजारांचा मावेजा तर ३७ हजार ३०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. लोकअदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे ३, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट ची २३, प्रलंबित दिवाणी प्रकरणे २५, फौजदारी प्रकरणे २०, दावा दाखल पूर्व प्रकरणे मोटार वाहन कायद्याअंतर्गत प्रकरणे ८४ अशी प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश के.के. गायकवाड, ए.एन. करमरकर, निरंजन नाईकवाडे, व्ही.एस. देशपांडे, आर.पी. परदेशी, एस.टी. कटारे, एस.बी. जोशी, मुंगीलवार, आर.आर. तेहरा, भाटिया, व्ही.पी. फडणवीस, सी.पी. शेळके, सुपेकर, ज्ञानेश्वर वाघ, ए.व्ही. वायाळ यांच्यासह गोविंदप्रसाद मुंदडा, बी.एम. साळवे, जे.सी. बडवे, आर.बी. पडोळ, एस.ए. कुलकर्णी, दीपक नाईक, एस.एम. कुलकर्णी, रोशन गोलेच्छा, महेंद्र साळवे, कल्पना त्रिभुवन, तिडके आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एफ. एम. खॉजा यांनी केले. यावेळी अधीक्षक पांचाळ, शेजवळ, दाभाडकर, कुलकर्णी, गडदे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)