शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

कापसामुळे दुष्काळातही विक्रमी उलाढाल

By admin | Updated: February 1, 2015 00:42 IST

संजय कुलकर्णी , जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची चाहूल लागली असून येत्या आठवडाभरात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईल,

 

संजय कुलकर्णी , जालनायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची चाहूल लागली असून येत्या आठवडाभरात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा आवक कमी झाल्याने तुरीचे भाव वधारले आहेत. अपुऱ्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून बाजारातील मालाची आवकही कमी झाली आहे. पांढरी आणि काळ्या जातीच्या तुरीचे दर ५५०१ रुपयांपर्यंत सारखेच असून लाल तूर ४८५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. ४९६ गव्हाचे दर १७६९ रुपयांपर्यंत तर लोकवन गहू १४६० ते १६०० रुपयांपर्यंत आहेत. शाळू ज्वारी १२०० ते २५००, बाजरी १०५० ते १६५० आणि मका १०५० ते ११६६ रुपयांपर्यंत आला आहे. सोयाबीनचा मागील वर्षी १० क्विंटलपर्यंत उतारा होता. मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही कमी झाल्याने त्याचे दर ३२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले. गावरान हरभरा २४०० ते ३२६५ रुपयांवर आहे. पिवळा गहू २२०० ते २५०० रुपये आणि लाल गुळ २०८० ते २१९० रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. शुक्रवारी जालना बाजार समितीमध्ये सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले यांनी दिली.जालना बाजार समितीच्या आवारात दुष्काळातही सीसीआयकडून कापसाच्या खरेदीमुळे गेल्या आठवड्यात २४ जानेवारी रोजी ७ कोटी २ लाख ४५ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. यामध्ये कापसाची खरेदी एकाच दिवशी १४ हजार ५६६ क्विंटल एवढी झाली. त्यापाठोपाठ तुरीची ५७ लाख ९१ हजार रुपये, सोयाबीन १९ लाख ९७ हजार तर ज्वारीची ९ लाख ५८ हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री झाली.