शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या नऊ कोटींच्या कामांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:16 IST

महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील ९ कोटी ८ लाखांची कामे सुरू झाल्याने दलित वस्तीचा विकास होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील ९ कोटी ८ लाखांची कामे सुरू झाल्याने दलित वस्तीचा विकास होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.शहर महापालिकेच्या तत्कालीन सभागृहाने दलित वस्ती निधीअंतर्गत ९ कोटी ८ लाखांच्या ६८ कामांना मान्यता दिली होती. १९ मे २०१७ रोजी ही मान्यता पूर्ण झाली असली तरीही त्यानंतर मात्र राजकीय वाद-विवादात ही कामे रखडली होती. दलित वस्ती निधी संदर्भातील तक्रारी या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या. इतकेच नव्हे, तर विधानसभेतही या विषयावर प्रश्न मांडण्यात आले आहेत. दरम्यान, आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या ९ कोटींच्या कामांना सोमवारी मान्यता दिली आहे. तत्कालीन सभागृहाने मंजूर केलेली ६८ कामे या निधीतून केली जाणार आहेत. या कामाची निविदा दोन दिवसांत निघणार आहे.त्याचवेळी मनपा प्रशासनाकडून उर्वरित १४ कोटी २७ लाखांच्या कामांचे प्रस्ताव आता आगामी सभागृहात ठेवण्यात येणार आहे. या निधीतून शहरातील निकड असलेली आणि लोकोपयोगी कामे महापालिका प्रशासनाने सुचवून मान्यतेसाठी सदर प्रस्ताव सभागृहापुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने पाठविलेल्या १४ कोटी २७ लाखांच्या कामांना मान्यता मिळाल्यानंतर दुसरी टप्प्यातील कामेही शहरात सुरू होतील, असा विश्वास महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.