शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणार- मुथा

By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST

बदनापूर :तलाठ्यांना दिलेल्या मोबाईलमध्ये एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जीपीआरएस प्रणालीद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रीक हजेरी व लोकेशन घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिले

बदनापूर :तलाठ्यांना दिलेल्या मोबाईलमध्ये एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जीपीआरएस प्रणालीद्वारे तलाठ्यांची बायोमेट्रीक हजेरी व लोकेशन घेण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिलेबदनापूर येथे महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मंगळवारी अँड्राईड मोबाईलचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुथा बोलत होत्या. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की शेतक-यांची सर्वात जास्त तक्रार तलाठी गावात दिसत नसल्याची असते त्यामुळे आता तलाठ्यांना दिलेल्या या मोबाईलच्या आधारे तलाठी किती वाजता कोणत्या गावात आहे हे कळण्याकरिता लवकरच एका प्रणालीची सुरूवात केली जाईल तसेच शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय साधून विकास साधावा असे आवाहन केले. तसेच आ. संतोष सांबरे यांनी हा उपक्रम स्तुत्य आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा आजच्या युगात मोबाईल अत्यंत आवश्यक आहे. मात्र तलाठ्यांनी हा मोबाईल नेहमी सुरू ठेवावा तसेच या कार्यालयात शुध्द पिण्याचे पाणी, संगणक आमदार निधीतून अथवा डीपीडीसी मधून देऊ असे आश्वासन दिले. तहसीलदार बालाजी सूर्यवंशी म्हणाले की, आता जग बदलले आहे. आपल्या कामकाजातही बदल होणे अपेक्षित आहे.आता या मोबाईलच्या वापरामुळे व्हॅटस् अ‍ॅपद्वारे महसुल विभागांंतर्गतची विविध कामे नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनांची माहिती अवघ्या २ तासात आपणाला मिळेल व लोकांची कामे जलदगतीने करून त्यांना लवकर न्याय देणे अशी या योजनेमागची अपेक्षा असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस. बी. घुले, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, दलितमित्र सांडूजी कांबळे, भगवानराव कदम, अंकुशराव शिंदे, अरूण पैठणे, गोरख लांबे, अंबादास कोळसकर, सुनील बनकर, मच्छिंद्र होळकर, अ.का.दवणे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मोबाईलचे वाटप करण्यात आले. हे मोबाईल प्रशासकीय खर्चाकरिता आलेल्या निधीतून मोफत देण्यात आले. बदनापूर तालुक्यात सर्वात प्रथम या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी विविध योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)