शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींचा आता ‘रिकॉल’ गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:18 IST

शहरातील ५० रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींच्या निविदा काढल्या. प्रत्येकी २५ कोटींचे काम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटदारही सरसावले. ‘सोयी’चा कंत्राटदार न आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या ‘रिकॉल’गेममध्ये सोयीच्या कंत्राटदारांना कामे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५० कोटींच्या निविदा रिकॉल होणार ही भविष्यवाणी एका मोठ्या कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वीच वर्तविली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ५० रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींच्या निविदा काढल्या. प्रत्येकी २५ कोटींचे काम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटदारही सरसावले. ‘सोयी’चा कंत्राटदार न आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या ‘रिकॉल’गेममध्ये सोयीच्या कंत्राटदारांना कामे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५० कोटींच्या निविदा रिकॉल होणार ही भविष्यवाणी एका मोठ्या कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वीच वर्तविली होती.दोन वर्षांपूर्वी शासनाने शहरातील सहा रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतील सर्व कामे महापालिकेने एका ‘सोयी’च्या कंत्राटदाराला दिली होती. या कामांमध्ये मनपा अधिकारी व पदाधिकाºयांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा ताव मारला होता. नंतर झालेल्या चौकशीत कोट्यवधींची अनियमितता झाल्याचे उघडही झाले होते. सहा महिन्यांपूर्वी महाराष्टÑ शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केला.या निधीत आणखी ५० कोटी टाकून शहरात ५० रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १०० कोटींच्या चार आणि डिफर पेमेंटच्या दोन अशा एकूण सहा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.इच्छुक कंत्राटदारांनी या कामांवर अक्षरश: उड्या मारल्या. जेव्हा मनपा अधिकाºयांनी कंत्राटदारांनी दाखल केलेली कागदपत्रे बघितली तर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्या कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत, त्यांना निविदा प्रक्रियेतून रद्द कसे ठरवावे, असा प्रश्न अधिकाºयांना पडला. मागील १५ ते २० दिवसांपासून मनपा पदाधिकारी निविदांची कमर्शियल बीड उघडा, निविदा अंतिम करून स्थायी समितीकडे पाठवा, असा आग्रह धरू लागले.मनपा अधिकारी विविध कारणे दाखवून टाळाटाळ करू लागले. कंत्राटदारांनी हजारोंच्या संख्येने कागद अपलोड केले आहेत, ते काढण्यासाठी आणि तपासण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, एका मोठ्या कंत्राटदाराने दहा दिवसांपूर्वीच सर्व निविदा रिकॉल होणार, अशी भविष्यवाणी वर्तविली. त्यावर इतर कंत्राटदारांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. शुक्रवारी जेव्हा मनपा अधिकाºयांनी निविदा रिकॉल करण्याचा निर्णय घेतल्यावर स्पर्धेत उतरलेल्या कंत्राटदारांची अक्षरश: झोपच उडाली.१९ कंत्राटदार अपात्र कसेमनपाच्या सहा कामांसाठी २१ निविदा मनपाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील दोनच निविदा पात्र आहेत. उर्वरित १९ निविदा अपात्र कशा असू शकतात? कोट्यवधी रुपयांची कामे करणाºया कंत्राटदारांनी डोळ्यात तेल टाकून निविदा भरल्या आहेत. या निविदा अपात्र ठरविल्या तर काहींनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी नमूद केले की, काही फेरनिविदा मंगळवारी प्रसिद्ध होणार आहेत.