ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19 - उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका करत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली.
पुढे एमआयएमने मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवली झालं ना डिपॉझिट जप्त, असं म्हणत एमआयएमचा बुडबूडा फुटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच एमआयएमचा इतिहास काय आहे, त्यांची पार्श्वभुमी कोणती ते तपासण्यासाठई गुगल सर्च करा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विकासाच्या मुद्यावर चर्चा करायला हवी असं म्हणत त्यांनी औरंगाबादच्या प्रश्नांना विसरणार नसल्याचे सांगितले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणारच तसेच हे शहर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. फुटिरतावाद्यांना मत म्हणजे एमआयएमला मत असं म्हणतं ठाकरेंनी सेना - भाजपाच्या निशाणीवर शिक्का मारण्याचे भावनिक आवाहन जनतेला केले.