शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्ष पॅनलमध्ये पदासाठी झाली बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलमध्ये बंडखोरी झाली आहे. पदवीधर गटात डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज डॉ. संभाजी भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली.

ठळक मुद्देविद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणूक : माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीची माघार; मतदान होणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलमध्ये बंडखोरी झाली आहे. पदवीधर गटात डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज डॉ. संभाजी भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली. प्रा. सुनील मगरे यांनी मात्र अर्ज मागे घेतला.संस्थाचालक गटात माजी उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे यांची बिनविरोध निवड न झाल्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. चार जागांसाठी १५ जून रोजी मतदान होईल.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील आरक्षित चार जागा बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित खुल्या गटातील चार जागांमधील दोन जागा बिनविरोध निघण्याची शक्यता होती. मात्र उत्कर्ष पॅनलमध्येच बंडखोरी झाल्यामुळे एकही जागा बिनविरोध निघाली नाही.संस्थाचालक गटात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली झाल्या. मात्र अपक्ष भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांनी टोपे यांच्या हालचालींना खो घालत अर्ज कायम ठेवले. त्यामुळे मनीषा टोपे यांनी माघार घेतली. याच वेळी उत्कर्षतर्फे जालन्याचे कपिल आकात यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे तिहेरी लढत होईल.प्राचार्य गटात दोघांनी माघार घेतल्यामुळे उत्कर्षचे डॉ. जयसिंग देशमुख आणि मंचचे डॉ. सुभाष टकले यांच्यात लढत होईल. पदवीधर गटात सर्व सदस्य उत्कर्षचेच असल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता होती. मात्र पहिल्यांदाच विजयी झालेले डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे तीन वेळा विजयी झालेले प्रा. संभाजी भोसले यांनी माघार घेण्यास नकार दिला.आ. चव्हाण यांचे विश्वासू असलेल्या डॉ. भारत खैरनार, प्रा. सुनील मगरे यांनी बंडखोरी न करता अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. काळे आणि प्रा. भोसले यांच्यात लढत होईल. यात विद्यापीठ विकास मंच प्रा. भोसले यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे.प्राध्यापक गटात दोघांत लढतव्यवस्थापन परिषदेसाठी प्राध्यापक गटात उत्कर्षतर्फे डॉ. राजेश करपे यांना उमेदवारी मिळाली. मंचतर्फे उस्मानाबादचे डॉ. गोविंद काळे यांना उमेदवारी दिली. या दोघांत सरळ लढत होणार आहे. या गटातही उमेदवारी मिळाली नसल्यामुळे डॉ. लक्ष्मीकांत शिंदे नाराज आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादElectionनिवडणूकRajesh Topeराजेश टोपे