शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन २० वर्षे झालेच नाही

By admin | Updated: July 1, 2017 23:45 IST

परभणी : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून प्रत्येक १० वर्षांना नवा कर लावणे अपेक्षित असताना मनपाने सर्वेक्षणच न केल्याने उत्पन्नावर मनपाला पाणी सोडावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून प्रत्येक १० वर्षांना नवा कर लावणे (पुनर्मूल्यांकन) अपेक्षित असताना मनपाने सर्वेक्षणच न केल्याने मागील २० वर्षांपासून लाखो रुपयांच्या उत्पन्नावर मनपाला पाणी सोडावे लागत आहे.परभणी नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर मनपाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार उत्पन्नावर भागविणे अपेक्षित होते. मात्र, मनपाचे उत्पन्न कमी असल्याने सुरुवातीचे काही दिवस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाने सहायक अनुदान दिले. मात्र, आता सहायक अनुदान बंद झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारासह शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मनपाला आर्थिक गणिते जुळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ही दोनच उत्पन्नाची प्रमुख साधने असल्याने हे साधने अधिक बळकट करण्यासाठी मनपाने पावले उचलणे गरजेचे होते. शहरातील वाढीव मालमत्तांची नोंद घेऊन त्या मालमत्तांना कर लावणे अपेक्षित होते. मात्र, मागील २० वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षणच करण्यात आले नाही. मध्यंतरी सर्वेक्षण करुन पुनर्मूल्यांकन करण्यासाठी लातूर येथील एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न वेळोवेळी लटकत राहिला. तब्बल वीस वर्षांपासून मनपाला मालमत्ता करातून जुजबी उत्पन्न मिळत गेले. जो कर लागू आहे तो देखील वेळेत वसूल केला जात नव्हता. त्यामुळे महापालिकेला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. बांधकामे वाढत गेली परंतु मनपाचा कर वाढला नाही. मागील वर्षीपासून मनपाने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या महानगरपालिकेने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ३० प्रभागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आणखी ४ प्रभागांचे सर्वेक्षण बाकी आहे. केलेल्या सर्वेक्षणात ५३ हजार ९०० मालमत्तांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मनपाकडे केवळ ४५ हजार ९६७ मालमत्तांचीच नोंद होती. त्यामुळे सुमारे ८ हजार मालमत्ता नव्याने नोंद झाल्या आहेत. या मालमत्तांच्या मागील २० वर्षांपासूनच्या करावर मनपाला पाणी सोडावे लागले. वेळीच पुनर्मूल्यांकन न झाल्याने परभणी महानगरपालिकेला २० वर्षांपासून आर्थिक संकटालाच सामोरे जावे लागले. (समाप्त)