शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लरअभावी आठवडी बाजाराकडे पाठ

By admin | Updated: November 14, 2016 00:37 IST

उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़

उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़ परिणाम होता तो केंद्र शासनाच्या हजार-पाचशे रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा! मागील चार दिवसांपासून बँकेत लागणाऱ्या लांबलचक रांगा़़ एटीएममध्ये असलेला खडखडाट आणि चिल्लरचा झालेला तुटवडा यामुळे आठवडी बाजारातील उलाढाल तब्बल ७५ टक्क्यांनी घटल्याचे व्यापारी, शेतकऱ्यांनी सांगितले़ या निर्णयाचे स्वागत होत असले तरी दैनंदिन गरजा भागविताना मात्र, तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले़शहरात प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो़ या आठवडी बाजारात शहरासह परिसरातील शिंगोली, वडगाव, देवळाली, आळणी, खानापूर, सांजा, सारोळा, वाघोली आदी विविध गावातील नागरिक साहित्य खरेदीसाठी येतात़ मात्र, रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़ ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पाचशे-हजार रूपयांच्या नोटा रद्द झाल्या आहेत़ १०० रूपयांच्या आतील चलनावर सध्या व्यवहार सुरू आहेत़ मात्र, अनेकांकडे पाचशे-हजार रूपयांच्या नोटा असून, चिल्लरचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारातील भाजीपाला, किराणा साहित्य, कपडे खरेदी करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शहरातील आठवडी बाजारात लाखो रूपयांची उलाढाल प्रत्येक रविवारी होते़ कापड, भाजीपाला, फळे, मांस, मसाले पदार्थ आदी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते़ मात्र, गावातून उस्मानाबाद शहरात येईपर्यंत आणि परत घरी जाईपर्यंत या नागरिकांना ठिकठिकाणी चिल्लर अभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ चिल्लर नसल्याने अनेकांनी आठवडी बाजारात न जाणेच पसंत केले़ प्रत्येक आठवडी बाजारात, महामार्गावर असलेली गर्दी रविवारच्या आठवडी बाजारात दिसून आली नाही़ केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व्यवसायावर जवळपास ७५ टक्के परिणाम झाल्याचे अनेक व्यापारी, शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)