औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच २६ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ व कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन व संविधान वाचन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान, डॉ. टी.आर. पाटील यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी सहभागी झाले.
विद्यापीठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
By | Updated: November 28, 2020 04:07 IST