शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या आतषबाजीत रावणदहन

By admin | Updated: October 12, 2016 01:16 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरात मंगळवारी विजयादशमीच्या सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात आकाशात आकर्षक

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरात मंगळवारी विजयादशमीच्या सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात आकाशात आकर्षक सप्तरंगी फटाक्यांची आतषबाजी व ‘जय श्रीराम’च्या गगनभेदी घोषणात ८१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे जल्लोषात दहन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील हजारो आबालवृद्ध व भाविकानी या नेत्रदीपक सोहळ्याला गर्दी केली होती.बजाजनगरातील श्रीराम जानकी ट्रस्टतर्फे दोन दशकांपासून दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी आठवडाभरापासून उत्तर प्रदेशातून आलेले कलावंत रामलीला सादर करीत असून रामलीला पाहण्यासाठी दररोज भाविकांची अलोट गर्दी उसळते आहे. मंगळवारी विजयादशमीनिमित्त रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी खास उत्तर प्रदेशातून आलेले मुस्लिम कलावंत चाँदभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपार मेहनत घेऊन भव्य असा रावणाचा ८१ फुटी पुतळा तयार केला होता. रावणदहन कार्यक्रमाला बजाजनगर, वडगाव, करोडी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, गोलवाडी व परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला, तरुण-तरुणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास श्री राम जानकी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आर.के.सिंह, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, डॉ. सुभाष माने, संजय जेजुरीकर, अशोक देवासी, मनोज तिवारी, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, जि.प.सदस्य अनिल चोरडिया, नगरसेवक सिद्धांत सिरसाठ, पुजारी राजेश्वरानंद पांडे आदींच्या उपस्थितीत रावण प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी रावणाच्या नाभीत बाण मारून आग लावली. बाण मारताच रावणाच्या पुतळ्याने क्षणार्धात पेट घेतला. याचप्रसंगी रावणासोबतच तयार करण्यात आलेल्या कुंभकर्ण, मेघनाद यांच्या पुतळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत दहन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी जय श्रीरामाच्या गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. बजाजनगरातील रामलीला मैदान गर्दीने फुलून गेले होते. रावणदहनाच्या आरंभी आकाशात रंग-बेरंगी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली होती.