शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फळ-भाज्यांमध्ये वाढले पेस्टीससाईडसचे प्रमाण

By admin | Updated: September 1, 2014 00:24 IST

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़

नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़ अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढल्याने देश व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली़ नवीन वाण बाजारात आले त्याचे उत्पादन विक्रमी झाले़ यातच वातावरणाने कुस बदलल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला़ हायब्रिड वाणात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ लागली़ आता तर विषाक्त फवारणीची सवयच जडली असून रोज आपण बाजारातून घरी आणलेली भाजी आणि फळेही विषाक्त होत आहेत़ याचे दुष्परिणाम आता ठळकपणे दिसायला लागले आहेत़ त्यामुळेच आधी सर्व पिकांवर फावरणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत़आजारांचे प्रमाण वाढलेशहरांचा गतीने विकास होत गेला़ या वाढत्या शहराची भूक भागवण्यिाची जबाबदारी शेतकऱ्यांवर आली़ यातून मिळणारा अधिकाधिक फायदा दिसून लागल्याने उत्पादनवाढीची कसरत सुरु झाली़ खेड्यावरुन येणाऱ्या भाजीपाल्याची क्रेझ वाढली़ परंतु हा भाजीपाला शहरी बाजारात टिकवून ठेवण्यासाठी रसायनांची मदत घेतली जाऊ लागली़ परिणामी शहरात आजराचे प्रमाण वाढत गेले़आता आॅरगॅनिक शेतीरसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरुन अधिक फायदा व्हावा या संकल्पनेतून सेंद्रिय शेतीची पद्धत पुढे आली़ आता सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, यासाठी प्रयत्न सुरु आहे़ परंतु या खतामुळे होणारे फायदे आणि त्या संदर्भातील तंत्रज्ञान अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत़ सेंद्रिय शेती म्हणजे काय संकल्पना आहे याची जाणीव करुन देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे़कृषी संशोधनावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च होतो़ परंतु यातून होणारे संशोधन, त्याचे फायदे व तोटे सांगण्याची गरज कुणालाच वाटत नाही़ काही वर्षात कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर वाढला़ हायब्रिड बियाणामुळेही समस्या निर्माण झाल्या़ जमिनीचा कस कमी झाला़ आता तर मानवी शरीरात कीटकांना संपविणाऱ्या रसायनांचा स्तर वाढल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत़ (प्रतिनिधी)