शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिग्मा हॉस्पिटलला ‘एनएबीएच’चे मानांकन

By admin | Updated: September 24, 2016 00:26 IST

औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने भारतातील सर्वोत्तम असे ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थके अर प्रोव्हाईडर्स’ (एन.ए.बी.एच.) हे मानांकन प्राप्त केले आहे.

औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने भारतातील सर्वोत्तम असे ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थके अर प्रोव्हाईडर्स’ (एन.ए.बी.एच.) हे मानांकन प्राप्त केले आहे. अशा प्रकारे मानांकितप्राप्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे मराठवाडातील पहिले रुग्णालय ठरले आहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. उन्मष टाकळकर आणि सीईओ डॉ. अजय रोटे यांनी दिली.‘एनएबीएच’ ही संस्था केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील ‘क्वालिटी काऊंसिल आॅफ इंडिया’चा एक भाग आहे. या मानांकनाचा अर्थ म्हणजे रुग्णसेवेची गुणवत्ता व रुग्णांची सुरक्षितता असा आहे. परदेशातून भारतात येऊ इच्छिणारे (मेडिकल टूरिझम) सर्वप्रथम ‘एनएबीएच’ मानांकन असलेल्या रुग्णालयांना प्राधान्य देतात. या मानांकनाचे निकष व मापदंड अत्यंत कठीण असून संपूर्ण रु ग्णालयातील व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असणे क्रमप्राप्त ठरते. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमधील सर्वांच्या एकत्रित व अथक प्रयत्नांनी २ वर्षांपेक्षा अधिक काळ परिश्रम घेऊन हे मानांकन मिळविले. ७ सप्टेंबरपासून पुढील तीन वर्षांसाठी हे मानांकन मिळालेले असून मराठवाड्यातील आणखी काही रुग्णालयांना हे मानांकन मिळाल्यास मेडिकल टूरिझम वाढेल, असे डॉ. उन्मेष टाकळकर म्हणाले.या मानांकनामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम रुग्णसेवा प्राप्त होईल. महाराष्ट्रात अवघ्या ४४ रुग्णालयांना हे मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे गुणवत्तेची चळवळ सुरू होण्याची गरज असून अन्य रुग्णालयांना हे मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. अजय रोटे यांनी सांगितले.अवयवदानाला गतीयुनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या पुढाकाराने अवयवदानाची चळवळ सुरू झाली. विभागातील पहिले अवयवदान या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यातील पुढचा टप्पा म्हणून लवकरच हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान करताना हृदय प्रत्यारोपणासाठी अन्य शहरांत जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने हे मोठे पाऊल ठरेल.