शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील सोने स्वत: वितळवून विकायचा राठोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 23:41 IST

लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची डोकेदुखी ठरलेला राजाभाऊ राठोड हा पहाटेच्यावेळी फिरायला म्हणून घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ काढत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची डोकेदुखी ठरलेला राजाभाऊ राठोड हा पहाटेच्यावेळी फिरायला म्हणून घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र हिसकावत पळ काढत होता. हिसकावलेले गंठण आणि मंगळसूत्र तो स्वत:च्या घरीच वितळवून विकत असल्याचे समोर आले आहे. यासाठी लागणारे साहित्यही त्याने आपल्या घरी ठेवले होते. वेळप्रसंगी वेड्याचे सोंगही घेत होता.औसा तालुक्यातील उजनी तांडा येथील मूळचा रहिवासी असलेला राजाभाऊ खेमराज राठोड (३३ ह. मु. औसा रिंग रोड, लातूर) हा पहाटे आपल्या पत्नीला व्यायामासाठी जातो, असे सांगून दुचाकीवरुन बाहेर पडायचा. लातूर शहरातील विविध रस्त्यांवर पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलांवर पाळत ठेवत पाठीमागून दुचाकीवरुन येत गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावत पळ काढायचा. हा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून तो करीत होता. याबाबत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने राजाभाऊ राठोडवर पाळत ठेवली. विशेष म्हणजे राठोडचा मोठा भाऊ हा पुण्यात वास्तव्य करतो. तेथे तो कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बरी आहे. या भावाने राजाभाऊला पुण्याला नेले. मात्र, भावाकडे फार दिवस तो राहिला नाही. पुन्हा लातुरात आलेल्या राजाभाऊने महिलांना लुटण्याचे, गंठण, मंगळसूत्र पळविण्याचा उद्योग सुरु केला. अतिशय चालाखपणे आणि सराईतपणे तो हे काम करीत होता. पोलिसांना अनेक दिवसांपासून चकमा देत त्याने चोऱ्या केल्या.