शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मिटमिटा शिवारात महिलेवर बलात्कार करून खून

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

औरंगाबाद : शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

औरंगाबाद : शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मिटमिटा शिवारात घडली. मारेकऱ्यांनी विवाहितेला सुमारे एक किलोमीटर फरफटत नेऊन तिच्या अंगावरील साडीने गळफास देऊन एका झाडाला लटकवले. अमिना बेगम शेख मुश्ताक (४०, रा. मिटमिटा) असे मृत महिलेचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, अमिना बेगम ही महिला शेळ्यांचा व्यवसाय करीत असे. रोज सकाळी १० वाजता शेळ्या चारण्यासाठी ती जंगलात जाई आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतत असे. ती गुरुवारी सकाळी शेळ्या घेऊन मिटमिटा शिवारात गेली. सायंकाळी तिच्या शेळ्या परत आल्या; परंतु ती काही आली नाही. त्यामुळे तिच्या पतीसह नातेवाईकांनी जंगलात जाऊन तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. मिटमिटा शिवारात असलेल्या तलावात ती पडली असावी, असा संशय शोधकर्त्यांना आला. त्यामुळे पतीने रात्री १ वाजेच्या सुमारास छावणी ठाणे गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. औरंगाबाद : अमिना बेगम ही तलावात पडली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. छावणी पोलिसांनी तत्परता दाखवून मनपा अग्निशामक दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळविली. अग्निशामक दलाचे जवान, पोलीस आणि गावकऱ्यांनी मिटमिटा शिवारातील तलावात रात्री ३ वाजेपर्यंत तिचा शोध घेतला. मात्र, ती काही सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शोधकार्य थांबविले. आज पहाटे शेख मुश्ताक आणि इतर गावकऱ्यांनी पुन्हा शोध सुरू केला. सकाळी साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती छावणी पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे घटनास्थळापासून सुमारे एक किलोेमीटर अंतरावर तिचा जेवणाचा डबा, छत्री आणि चप्पल पडलेली दिसली. तेथून तिला एक किलोमीटरपर्यंत फरफटत ओढून नेण्यात आल्याचे आढळून आले. आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून तिच्याच साडीने गळफास देऊन एका झाडाला लटकावण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही काळ तणाव...अमिना बेगमचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी अमिना बेगमच्या खुन्या विरोेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पुढाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. घाटीतील डॉक्टरांकडून शवविच्छेदनाचा अहवाल मिळताच छावणी पोलिसांनी खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे मिटमिटा गावात तणाव निर्माण झाला होता. अंत्यविधीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस उपायुक्त वसंत परदेशी हे छावणी ठाण्यात, तर सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक आघाव हे मिटमिट्यात बसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते.