शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

लातूरच्या महिलेवर वाळूजमध्ये बलात्कार

By admin | Updated: April 22, 2016 00:58 IST

वाळूज महानगर : लातूर जिल्ह्यातील एका २६ वर्षीय महिलेवर वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनीत दोनदा बलात्कार करणारा आरोपी व तिची बदनामी करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले.

वाळूज महानगर : लातूर जिल्ह्यातील एका २६ वर्षीय महिलेवर वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनीत दोनदा बलात्कार करणारा आरोपी व तिची बदनामी करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. तुषार राजपूत असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रभारी पो. नि. सुरेशकुमार टाक यांनी सांगितले की, पीडित महिलेशी आरोपीने संपर्क साधून तुझा पती आमच्याकडे आला असल्याचे सांगितले. त्यामुळे ती महिला लातूरहून पतीला भेटण्यासाठी वाळूजला ८ नोव्हेंबर २०१५ ला आली होती. येथे आल्यानंतर आरोपी राजपूतने त्या महिलेला मारहाण करून दोनदा बलात्कार केला. आरोपी तुषार राजपूतचे साथीदार सागर अवचरमल, विजय वरणकर व विकास (पूर्ण नाव माहीत नाही) हे म्हाडा कॉलनीत तुषारच्या घरी थांबलेले होते. घटनेनंतर महिलेने याची वाच्यता केली नाही व पुन्हा मूळगावी परत गेली. दरम्यान, या पीडित महिलेच्या पतीचा वाढदिवस असल्यामुळे १६ डिसेंबर २०१५ रोजी आरोपी तुषार राजपूत व त्याचे साथीदार भेटले होते. आरोपींनी तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले होते. त्या महिलेचे फोटो लोकांना दाखवून ही महिला वेश्या व्यवसाय करते, असे म्हणून तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात आल्यामुळे महिलेने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन प्रकाराची माहिती दिली. पीडित महिलेवर बलात्कार व तिची बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरूहोती.