आष्टी : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी कऱ्हेवाडी येथे उघडकीस आली. आठ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.कऱ्हेवाडी येथील पीडित महिलेचे गावातीलच बाबासाहेब सांगळे यांच्या कुटुंबियांशी जुने भांडण आहे. बाबासाहेब याने रविवारी तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. महिला तक्रार देण्यास पुन्हा पोलीस ठाण्याकडे जाताना वाटेतच अडवून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. शिवाय, कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण करून गावठी पिस्तूलचा धाक दाखवला. याप्रकरणी बाबासाहेब सांगळेसह भगवान पाटीलबा सांगळे, अंंकुश भगवान सांगळे, मच्छिंद्र रामचंद्र सांगळे, नितीन कुंडलीक सांगळे, सचिन कुंडलीक सांगळे, अशोक नारायण सांगळे या आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले. (वार्ताहर)
तक्रार दिली म्हणून बलात्काराचा प्रयत्न
By admin | Updated: April 17, 2017 23:30 IST