औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे भारत आणि चीनचा हात आहे, असा गंभीर आरोप करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा दानवे यांचे मत हे केंद्र सरकारचे भाजपचे अधिकृत असल्याचे समजू असा इशारा शनिवारी येथे शिवसेनेने दिला.
दानवे यांच्या निषेधार्थ क्रांती चौकात सायंकाळी शिवसेनेने जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जयजयकार करण्यात आला.
महागाईचा उडाला भडका ...केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली, मोदी सरकारची जाण्याची वेळ आली, अशा घोषणाही देऊन वाढत्या महागाईचा निषेध नोंदवला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी या निदर्शनाचे नेतृत्व केले.
नंदकुमार घोडेले, बाबासाहेब डांगे, गिरजाराम हाळनोर, अनिल पोलकर, किशोर नागरे, विश्वनाथ स्वामी, सुनीला क्षत्रिय, बंडू ओक, अभिजित पगारे, सोमनाथ बोंबले, संतोष जेजुरकर, विनायक पांडे, विजय वाकचौरे, बाळासाहेब थोरात, जयसिंह मोहिते, सुशील खेडकर,राजू वैद्य,गोपाळ कुलकर्णी, कृष्णा राठोड, प्रतिभा जगताप,अनिता मंत्री, नलीनी बाहेती, कमल चक्रे, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, नलीनी महाजन, वंदना कुलकर्णी, किरण शर्मा,पद्मा तुपे, सुनिता सोनवणे, सुशीलाला बिनोरकर, मनीषा गायके, अंजना गवई,अरुणा भाटी, मंजूषा नागरे, कविता पाटील, संतोष जाटवे, नंदू लबडे हे निदर्शनात सहभागी झाले होते.