शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर फोटो टाकून युवतीला मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:19 IST

तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एकाने तरुणीचे खाजगी फोटो फेसबुकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एकाने तरुणीचे खाजगी फोटो फेसबुकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.पीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा ब्युटी पार्लरचा व्यावसाय आहे. ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत तिचा पती नारायण हारेर येत असे. त्यातून ओळख झाल्याने आम्ही सर्व कार्यक्रमात जायचो, सार्वजनिक फोटो काढायचो, आमच्यात बहीण भावासारखे नाते होते.मात्र ,चार महिन्यांपासून नारायण वाईट उद्देशाने माझा पाठलाग करु लागला. माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझे लग्न होऊच देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. माझे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून त्याने फोटो मिक्स करून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर अपलोड केले व माझ्या जवळच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर पाठवले. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरील फोटो काढायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावेत. तुझ्या बापाने व मावशीने पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली.बदनामीमुळे मी गुपचूप राहिले, असे फिर्यादीत नमूद आहे. नारायण हारेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करीत आहेत.