शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या पुन्हा बँकेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:48 IST

शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून हैराण आहेत. एवढेच काय तर शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत ताटकळत बसत आहेत. यामध्येही रोज मोजक्याच शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येते होते. उर्वरितांना दुसºया दिवशी पुन्हा मोठी पायपीट करावी लागली. एवढी पायपीट करुनही शेतकºयांचे कर्ज माफ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. तरीही कर्जमाफीसाठी शेतकºयांची कसरत सुरु आहे. विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीसाठी एवढे निकष घातले आहेत. ते पूर्ण करता - करताच अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. आता तर जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन भरणेही पूर्ण झाले नसले तरी आता पुन्हा शासनाने नवीन फतवा काढून शेतकºयांना पेचात पाडले आहे. आॅनलाईन भरलेले कर्जमाफीचे अर्ज, त्याची पावती, तसेच सातबारा, होल्डींग, कर्ज खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड, बचत खात्याची झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी अर्ज भरले होते, असे शेतकरी नुकतेच शांत झाले होते. आता नव[न सूचनांमुळे पुन्हा शेतकºयांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे बँकेच्या रांगेत पुन्हा शेतकरी ताटकळत उभे राहिले होते. तर काही वयोवृद्ध शेतकºयांना उभे राहणे शक्य नसल्याने बसून होते. येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकºयांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेत इतर व्यवहार बंद करुन शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. १६ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. आता तर सात बारा आणि होल्डींग केवळ दोन दिवसात भरणे होतील का? हा यक्ष प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. एवढे करुनही कर्ज माफ झाले नाही तर मेहनतीवर पाणी पडेल.