आष्टी : परतूर तालुक्यातील पळशी येथील महिला शेतात कापूस वेचणीचे काम करताना अचानक आलेल्या रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पळशी येथील महिला मुक्ताबाई पुंजाराम वावरे यांचे कासापुरी शिवारात गट क्र.३६६ मध्ये शेत आहे. त्या घरातील इतर महिलांसह शेतात कापूस वेचणीचे काम करीत होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास शेतात अचानक एक रानडुक्कर घुसले व त्याने मुक्ताबाई यांच्यावर हल्ला केला. रानडुक्कर पाहताच इतर महिलांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र मुक्ताबाई या रानडुकराच्या तावडीत सापडल्याने त्यांच्या दोन्ही हातास चावा घेऊन गंभीर जखमी केले. इतर महिलांनी आरडाओरड केल्याने रानडुकराने पळ काढला. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
By admin | Updated: February 5, 2017 23:38 IST